शेअर बाजार 250 अंकांनी कोसळला, अदानी पोर्ट्स, एचसीएल टेकचे भाव घसरले

आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराच्या कामकाजात सुरुवातीलाच 250 अंकांनी घसरून 81,750 वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 80 अंकांनी घसरून 25 हजारवर स्थिरावला. 30 पैकी तब्बल 23 शेअर्सचे भाव घसरले तर 7 शेअर्सचे भाव वधारल्याचे दिसले.

बीईएल, एम अॅण्ड एम आणि टाटा मोटर्समध्ये किंचित वाढ झाली. आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक आणि अदानी पोर्ट्समध्ये घसरण झाली. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 32 समभाग घसरले आणि 28 समभागांचे भाव वधारले. आयटी, धातू आणि खासगी बँकिंगचे निर्देशांक घसरले, तर रिअल्टी, मीडिया आणि फार्मा किरकोळ फॉर्ममध्ये दिसले. आशियाई बाजारपेठेत जपानचा निक्केई 0.001 टक्क्यांनी वाढून तो 42,615 वर पोहोचला. तर अमेरिकेचा डाऊ जोन्स 0.34 टक्क्यांनी घसरला आणि नॅस्डॅक पंपोझिटदेखील 0.34 टक्क्यांनी घसरला.

गुंतवणूकदारांनी जुलैमध्ये 47 हजार कोटींचे शेअर्स विकले

जुलै महिना शेअर बाजारासाठी अतिशय नकारात्मक राहिला. या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण 47 हजार 666.68 कोटींचे शेअर्स विकले. त्याचवेळी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 60,939.16 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली, तर ऑगस्टमध्ये गुंतवणूकदारांनी 24,228.50 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. याच महिन्यात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी एकूण 66,512.76 कोटी रुपयांचे निव्वळ शेअर्स खरेदी केले.

Comments are closed.