हाताला सलाईन अन्…; हॉस्पिटलच्या बेडवर संजू सॅमसन, अचानक काय झालं? टीम इंडिया टेन्शनमध्ये
रुग्णालयात संजू सॅमसन का: भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन याच्याबाबत आशिया कपपूर्वी एक चिंताजनक बातमी समोर आली. त्याची पत्नी चारुलता हिने हॉस्पिटलच्या बेडवर संजू सॅमसन झोपलेला आणि हाताला सलाईन असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि क्षणात चाहत्यांची धाकधूक वाढली. अचानक स्टार खेळाडू हॉस्पिटलमध्ये कसा काय, नेमकं झालं तरी काय? असा प्रश्न सर्वांना पडला.
संजू सॅमसनला अचानक काय झालं?
मात्र दिलासादायक बाब म्हणजे, जास्त काही नव्हते. थोडा त्रास झाल्याने सॅमसनला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं. संध्याकाळी तो लगेचच पुन्हा मैदानावर परतला आणि सामन्यातही उतरला. त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाही. आशिया कप सुरू होण्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आशिया कप 2025 साठी संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये या स्पर्धेची सुरुवात होणार असून 28 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेच्या काही आठवडे आधीच संजूच्या प्रकृतीबद्दल ही माहिती बाहेर आली.
चारुलथाने 21 ऑगस्ट दुपारी 3 वाजता संजू रुग्णालयात असल्याचं इंस्टाग्राम स्टोरीद्वारे सांगितलं. पण त्याच रात्री तो केरळ क्रिकेट लीग (KCL 2025) मध्ये मैदानात उतरला. आपल्या कोची ब्ल्यू टायगर्स संघाकडून खेळताना त्याने आदानी तिरुवनंतपुरम रॉयल्सवर 8 गडी राखून विजय मिळवला. सॅमसनला फलंदाजीची संधी न मिळाली तरीही तो संध्याकाळी 7.45 वाजता झालेल्या सामन्यात मैदानावर होता.
मिळालेल्या माहितीनुसार, संजू सॅमसनला ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. सावधगिरीचा उपाय म्हणून तो रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर तो थेट सामना खेळून पुन्हा रुग्णालयात गेला. सध्या तो घरी असून तब्येत पूर्वीपेक्षा चांगली आहे.
आशिया कप 2025 साठी भारताचा संघ (Team India Squad For Asia Cup 2025) :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग.
स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जैस्वाल, प्रसीद कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि ध्रुव जुरेल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.