‘बॅटल ऑफ गलवान’चे लडाखमध्ये शूटिंग

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खानने या चित्रपटाची शूटिंग लडाखमध्ये सुरू केली आहे. चित्रपटाच्या सेटमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सलमानचा हा चित्रपट 2020 मधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंदुस्थान आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. 22 ऑगस्टपासून 3 सप्टेंबरपर्यंत या चित्रपटाचे दृश्य लडाखमध्ये चित्रित केले जाणार आहे. याआधी सलमान ‘सिकंदर’मध्ये दिसला होता.
Comments are closed.