बांगलादेशीला हिंदुस्थानचा पासपोर्ट कसा मिळाला? हायकोर्टाने मानपाडा पोलिसांकडून मागितला खुलासा

मुंबई-हायकोर्ट

बांगलादेशीला हिंदुस्थानचा पासपोर्ट जारी करताना केलेल्या पोलीस पडताळणीचा तपशील सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने मानपाडा पोलिसांना दिले आहेत.

मोहम्मद अब्बास अली शेखला पासपोर्ट जारी करताना केलेल्या पोलीस पडताळणीची माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करा, असे आदेश न्या. रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने पोलिसांना दिले. शेख हा बांगलादेशीच आहे याचा पुरावादेखील प्रतिज्ञापत्रावर सादर केला जाईल, अशी हमी पोलिसांनी न्यायालयाला दिली.

Comments are closed.