माझं लेकरु मेलं नाही, त्यांनी मारलंय…; श्रीनाथ गित्तेच्या आईला अश्रू अनावर, नेमकं प्रकरण काय
बीड गुन्हा: ‘माझं लेकरू मेलं नाही ..त्यांनी मारलंय .. हे सगळं साने गुरुजी आश्रम शाळेचे संस्थाचालक उद्धव कराड यानं केल्याचा आरोप श्रीनाथ गीतेच्या आईने केलाय .. बीडच्या परळी तालुक्यातील नंदागवळी येथे वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तंत्वावर नोकरी लागलेल्या तरुणाने संस्थाचालकाच्या अपमानास्पद वागणुकीमुळे राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता .श्रीनाथ गीते असं या तरुणाच नाव असून मृत तरुणाच्या आईने गंभीर आरोप केले आहेत .
नेमकं प्रकरण काय ?
वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नोकरीस लागलेल्या तरुणाला संस्थाचालकाने अपमानास्पद वागणूक (Beed Crime News) दिल्याने टोकाचे पाऊल उचललयं. आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना परळी तालुक्यातील नंदागवळ येथे घडली. या प्रकरणात दोन संस्थाचालकांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनाथ गोविंद गित्ते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
श्रीनाथ गीत्तेच्या आईचे आरोप काय?
2010 मध्ये माझे पती वारले , 2016 पासून आम्ही माझ्या मुलाच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होतो.. सगळं त्या साने गुरुजी शाळेच्या उद्धव कराड न केलय.. माझं लेकरू मेलं नाही त्यांनी मारलंय.. त्याचा मानसिक छळ करून.. एक तर त्याचे जेवढे शिक्षण होतं त्या पदाची नोकरी त्याला दिली नाही.. आमच्या परिस्थितीमुळे त्यांना आहे त्या पदावर होकार दिला.. त्यातही त्याला खूप टॉर्चर केलं.. मला तो सांगायचा आई मला खूप काम करायला लावतात.. पाणी काढायला लावते.. याला सांगितलं त्यांन.. महिनाभरापासून सांगत होता.. चार चार माणसाचं काम सांगत होते.. त्या संस्थाचालकाने आणि या संस्था चालकाने मिळून माझ्या लेकराला मारलं.. उद्धव कराडच्या साने गुरुजी आश्रम शाळेची चौकशी करावी त्याने आजवर कोणाकोणाला नोकरीत घेतले हे देखील तपासावे.. अशी मागणी आता श्रीनाथ याची आई सुनिता गित्ते यांनी केली आहे.
‘तेव्हा तो जो गेला तो परत आला नाही..’
तर श्रीनाथ गित्ते हा महिनाभरापूर्वी आमच्याकडे ऑर्डर घेऊन आला होता.. आमच्या संस्थेमध्ये जागा शिल्लक नसताना देखील वरिष्ठांनी ऑर्डर दिलेली असल्याने आम्ही त्याला रुजू करून घेतले होते. त्याने कागदपत्राची पूर्तता देखील केली होती. केवळ जात पडताळणीचा पडताळणीचे प्रमाणपत्र बाकी होते.. यादरम्यानच दोन दिवसापूर्वी त्याला कोणाचा तरी फोन आला आणि त्याने मुख्याध्यापकांना आईची तब्येत खराब झाली आहे म्हणून मला जायचे आहे असे सांगितले. तेव्हा तो जो गेला तो परत आला नाही.. जी घटना घडली त्याची संपूर्ण चौकशी व्हावी अशी आमची देखील मागणी आहे..
श्रीनाथला अपमानास्पद वागणूक अतिरिक्त काम करण्यास भाग पाडले
संस्थाचालक संजय राठोड यांनी देखील गित्ते कुटुंबाला त्रास दिला. तसेच श्रीनाथ याला अपमानास्पद वागणूक (Beed Crime News) देत अतिरिक्त काम करण्यास भाग पाडले.या सर्व प्रकाराचा ताण सहन न झाल्याने श्रीनाथ याने दिनांक 22 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आता परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय राठोड व उद्धव कराड या दोन संस्थाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी ग्रामीण पोलिस करत आहेत.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.