आशिया कपच्या आधी आली धक्कादायक बातम! शुबमन गिल जाणार संघाबाहेर?
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि टेस्ट संघाचा कर्णधार शुबमन गिल याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शुबमन गिल सध्या आजारी आहेत आणि घरी विश्रांती घेत आहेत. त्यामुळे कदाचित ते मैदानावर खेळण्यासाठी उतरू शकणार नाहीत. याच कारणामुळे गिल या आठवड्यापासून बंगळुरूमध्ये सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीत भाग घेऊ शकणार नाहीत.
बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीसाठी नॉर्थ झोन संघाची घोषणा करताना शुबमन गिल यांची कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, त्यांच्या तब्येतीमुळे व्यवस्थापनाला बदल करावा लागला. गिल बाहेर झाल्यानंतर आता त्यांच्या जागी अंकित कुमार संघाचे नेतृत्व करतील. तसेच, निवड समितीने आधीच गिलच्या बॅकअप म्हणून शुभम रोहिल्ला यांना संघात सामील केले होते.
दिलीप ट्रॉफीचे आयोजन 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान बंगळुरूमध्ये होणार आहे. नॉर्थ झोनचा पहिला सामना ईस्ट झोनविरुद्ध बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर खेळला जाणार आहे. गिल फिट झाले असते तरीही त्यांना संपूर्ण स्पर्धा खेळणे कठीण होते, कारण 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये त्यांना भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे.
शुभमन गिल नुकतेच इंग्लंड दौऱ्यावरून परतले आहेत, जिथे त्यांनी जबरदस्त फलंदाजी करत एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील 5 कसोटी सामन्यांत एकूण 754 धावा केल्या. त्यांच्या या उत्कृष्ट फॉर्ममुळे त्यांना आशिया कपसाठी भारताच्या टी20 संघाचा उपकर्णधार बनविण्यात आले आहे.
गिल बाहेर झाल्याने नॉर्थ झोनला मोठा धक्का बसला आहे. आता संघाचा विश्वास उपकर्णधार अंकित कुमारवर असेल, तर शुबमन गिल मात्र फिट होऊन आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी दमदार पुनरागमन करण्यावर लक्ष केंद्रित करतील.
Comments are closed.