Android फोनमध्ये अचानक बदलला कॉलिंग इंटरफेस, कारण काय?

Android फोनचा डायलर इंटरफेस अचानक बदललं असेल. पण कोणतेही अपडेट न करता फोनमध्ये ही सिस्टीम कशी काय बदलली? त्यामुळे नागिरकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत.  पण खरच हे फिचर्स गुगलने बदललेत की एखाद्या हॅकर्सने असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहे. पण त्याचं खरं कारण काय आहे? हे आपण जाणून घेऊयात..

Google ने आपल्या फोन अॅपचा जुना लेआऊट बदललं आहे. आता कॉल लॉगमध्ये जुनी ग्रुपिंग लिस्ट दिसणार नाही. आता प्रत्येक कॉल हिस्ट्री वेगवेगळी दाखवली जाईल. कॉल हिस्ट्री आणि फेवरेट कॉन्ट्रॅक्ट लिस्ट आता एक ठिकाणी करण्यात आलीये.

इन-कॉल स्क्रीनमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. आता कॉल रिसिव्ह करण्यासाठी किंवा डिस्कनेक्ट करण्यासाठी मोठे गोल आणि आयताकृती बटणे देण्यात आली आहेत. यासोबतच, एक नवीन जेश्चर सिस्टम देखील जोडण्यात अॅड करण्यात आली, ज्याद्वारे कॉल उचलण्यासाठी किंवा डिस्कनेक्ट करण्यासाठी स्वाइप आणि टॅप दोन्ही पर्याय वापरू शकतात.

गुगलने सर्व्हर-साइड अॅक्टिव्हेशनद्वारे हा बदल केलाय. म्हणजेच, कोणत्याही अॅप अपडेटशिवाय हा इंटरफेस बदललाय. काही जणांना हा बदल चांगला वाटला तर काही जण याने नाराज झालेत.

गुगलने म्हटले आहे की लवकरच मेसेजेस, कॉन्टॅक्ट्स, जीमेल आणि फोटोजसारख्या इतर अॅप्समध्येही हेच बदल दिसून येतील.

आणखी वाचा

Comments are closed.