‘भारत-पाक सामना पाहणं म्हणजे देशाशी विश्वासघात..' या माजी दिग्गजाने केले मोठे वक्तव्य
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबरला रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. 9 सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. सर्व सामने यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. मात्र भारत-पाकिस्तान सामन्याबाबत देशात अनेक जण विरोधही व्यक्त करत आहेत. आता या यादीत भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारी यांचेही नाव सामील झाले आहे.
मनोज तिवारी यांनी भारत-पाकिस्तान सामन्याबाबत बोलताना सांगितले की, मला थोडं आश्चर्य वाटतंय की हा सामना (India-pakistan) होणार आहे. पहलगाव हल्ल्यानंतर ज्यात इतके निरपराध नागरिक मारले गेले होते आणि त्यानंतर झालेल्या युद्धानंतर खूप चर्चा होती की यावेळी आपण ठोस प्रत्युत्तर देऊ. पण त्यानंतर काही महिन्यांत सगळे विसरून गेले. मला अजिबात विश्वास बसत नाही की हा सामना होणार आहे. माणसाच्या जीवाची काही किंमत नाही का? हा सामना मी अजिबात पाहणार नाही. मनोज पुढे म्हणाले की पाकिस्तानसोबत खेळून नेमकं काय साध्य करायचं आहे? माणसाच्या जीवाची किंमत खेळापेक्षा मोठी असायला हवी. मी सामना पाहणारच नाही हा प्रश्नच उद्भवत नाही.
सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया कप 2025 खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सूर्या पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाची कर्णधाराची धुरा सांभाळणार आहेत. यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स लीग 2025 मध्ये इंडिया चॅम्पियन्सच्या खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला होता. या लीगच्या उपांत्य सामन्यातही भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता.
Comments are closed.