ट्रेंड – मांजरीचं डोहाळे जेवण

भटक्या कुत्र्यांच्या मुद्दय़ावरून देशात सध्या जोरदार गोंधळ सुरू आहे. भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरून हटवून एका ठिकाणी डांबण्यास विरोध होत आहे. या विरोधातून मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्यापर्यंत लोकांची मजल गेलीय. प्राणीप्रेम काय असतं हे यातून दिसतं. हे झालं एक उदाहरण, पण अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला रोजच्या रोज दिसतात. पाळीव प्राण्यांवरील बेहद्द प्रेमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय. हा व्हिडीओ आहे एका मांजरीच्या डोहाळे जेवणाचा. चेरी असं या मांजरीचं नाव आहे. एका कुटुंबात हा सोहळा साग्रसंगीत साजरा झाला. इन्स्टावरील या व्हिडीओ पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.