36 चौकार, 18 षटकार… 431 धावांचा डोंगर; हेडने आफ्रिकेच्या गोलंदाजीच्या चिंधड्या केल्या
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय: रविवारी ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि कॅमरून ग्रीनने दक्षिण आफ्रिकेची धुलाई करत त्यांच्या अक्षरशः चिंधड्या केल्या. मॅकेच्या मॅकेच्या ग्रेट बॅरियर रीफ अरेना येथे झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत कांगारू संघाने फक्त दोन गडी गमावून तब्बल 431 धावा केल्या. यादरम्यान, त्यांनी 36 चौकार आणि 18 षटकार मारले. हा ऑस्ट्रेलियाचा वनडे क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धावसंख्या विक्रम ठरला. केवळ चार धावांनी ते त्याचा सर्वात मोठा स्कोर मोडण्यापासून चुकले.
इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं…
या सामन्यात सलामीवीर ट्रॅव्हिस हेड, कार्यवाहक कर्णधार मिचेल मार्श आणि अष्टपैलू कॅमरून ग्रीन यांनी शतकं ठोकत इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाच्या वनडे इतिहासात प्रथमच तीन खेळाडूंनी एका सामन्यात शतकं झळकावली. यापूर्वी हे पराक्रम केवळ दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने केला होता.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अंतिम एकदिवसीय सामन्यात आनंद मिळविला म्हणून गॅलरी 🤯#AUSVSA 📝: https://t.co/jizynhw7cc pic.twitter.com/cihpvmadnx
– आयसीसी (@आयसीसी) ऑगस्ट 24, 2025
ट्रॅव्हिस हेडने आफ्रिकेच्या गोलंदाजीच्या चिंधड्या केल्या
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला हेड आणि मार्श या जोडीने दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून 250 धावांची भागीदारी केली. हेडने 103 चेंडूत 142 धावा करताना 17 चौकार आणि 5 षटकार ठोकले. त्याला केशव महाराजने आऊट केले. दुसरीकडे मार्शने 106 चेंडूत 100 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. या दरम्यान त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतल्या 3,000 धावा पूर्ण केल्या.
मार्श आऊट झाल्यानंतर ग्रीनने जबरदस्त आक्रमक फलंदाजी करत पहिल्याच शतकाची नोंद केली. फक्त 47 चेंडूत शतक ठोकत त्याने वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वात जलद शतकवीर होण्याचा मान मिळवला. सर्वात जलद शतक ग्लेन मॅक्सवेलने 40 चेंडूत 2023 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध ठोकले होते. ग्रीनने अखेरपर्यंत 55 चेंडूत नाबाद 118 धावा ठोकल्या ज्यात 6 चौकार आणि 8 षटकार होते. ग्रीनला अलेक्स केरीने (37 चेंडूत नाबाद 50 धावा, 7 चौकार) अप्रतिम साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 164 धावांची अखंड भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला डोंगराएवढ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवली.
ऑस्ट्रेलियाची एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या
- 434/4 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2006
- 431/2 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मॅके, 2025
- 417/6 विरुद्ध अफगाणिस्तान, WACA, 2015
- 399/8 विरुद्ध नेदरलँड्स, दिल्ली, 2023
एका वनडे सामन्यात संघासाठी शतक करणारे तीन खेळाडू
- दक्षिण आफ्रिका (अमला, रोसो, एबी व्हिलियर्स) विरुद्ध वेस्ट इंडिज, जोहान्सबर्ग, 2015
- दक्षिण आफ्रिका (क्विंटन, फाफ डू प्लेसिस, एबी व्हिलियर्स) विरुद्ध भारत, वानखेडे, 2015
- इंग्लंड (सॉल्ट, मलान, बटलर) विरुद्ध नेदरलँड्स, अॅमस्टेलवीन, 2022
- दक्षिण आफ्रिका (क्विंटन, रासी, मार्कराम) श्रीलंका विरुद्ध, दिल्ली 2023
- ऑस्ट्रेलिया (हेड, मार्श, ग्रीन) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मॅके, 2025
आणखी वाचा
Comments are closed.