आशिया कप 2025 मध्ये सूर्या आणि हार्दिक कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार? जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून यूएईमधील दुबई आणि अबू धाबी येथे होणार आहे. भारतीय संघ (Indian cricket team) आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध खेळेल. या स्पर्धेत भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करणार आहे.

बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघात तरुण व अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. संभाव्य प्लेइंग इलेव्हनकडे पाहिल्यास अश्या प्रकारे असू शकते. शुबमन गिल (Shubman gill) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) ही सलामी जोडी ठरू शकते.
कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा त्याचा नेहमीसारखा महत्त्वाचा क्रमांक 4 सांभाळेल. तर हार्दिक पांड्या (hardik pandya) फलंदाजीसाठी क्रमांक 5 वर उतरू शकतो.

या नंतर संघात श्रेयस अय्यरऐवजी (Shreyas iyer) काही तरुणांना संधी मिळाली आहे. त्यामुळे भारताची मधल्या फळीतील फलंदाजी अधिक आक्रमक होईल, अशी अपेक्षा आहे. भारताचा सर्वात मोठा सामना 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्याकडे सर्व भारतीय चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (IND vs PAK)

Comments are closed.