जाणून घ्या जगातील असुरक्षित देशांची यादी, भारताचा नंबर कितवा?
जगात शांततेपेक्षा अस्थिरतेचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. मध्यपूर्वेतील संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध आणि इतर भागातील दहशतवादामुळे Global Peace Index 2025 नुसार जगात शांततेचा स्तर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी घसरण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कोणते देश सुरक्षित आहेत आणि कोणते देश सर्वाधिक असुरक्षित आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुरक्षित देशांची यादी
या अहवालानुसार, जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून आइसलँडने पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. 2008 पासून आइसलँड हे स्थान कायम राखत आहे. यादीतल्या 10 देशांपैकी 8 देश हे युरोपमधील आहेत. आशियातील एकमेव सुरक्षित देश सिंगापूर सहाव्या स्थानावर आहे.
सर्वात सुरक्षित 10 देश:
1.आइसलँड
2.आयर्लंड
3.न्यूझीलंड
4. ऑस्ट्रिया
5.स्वित्झर्लंड
6.सिंगापूर
7.पोर्तुगाल
8.डेन्मार्क
9. स्लोव्हेनिया
10.फिनलंड
असुरक्षित देशांची यादी
याउलट, सर्वाधिक असुरक्षित देशांमध्ये रशियाचा समावेश आहे. 163 देशांपैकी सर्वात खालच्या क्रमांकावर म्हणजे 163 व्या स्थानी रशिया आहे. युद्ध आणि अंतर्गत संघर्षामुळे युक्रेन दुसऱ्या, तर आफ्रिकेतील अनेक देश देखील असुरक्षिततेच्या यादीत आहेत.
सर्वात असुरक्षित 10 देश:
1.रशिया
2.00
3.सुदान
4.डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो
5.येमेन
6.अफगाणिस्तान
7. सेरिया
8.दक्षिण सुदान
9.इस्रायल
10. माली
भारताची स्थिती
भारत या यादीत 115 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी देखील भारत ह्याच स्थानावर होता. पाकिस्तान मात्र थोडा वर गेला असून त्याचा क्रमांक 144 वरून 143 वर आला आहे. या यादीत तुर्की 146 व्या क्रमांकावर आहे.
या क्रमवारीसाठी खालील महत्त्वाचे निकष विचारात घेण्यात आले:
1)दिवस आणि रात्री फिरताना नागरिकांना वाटणारी सुरक्षा
2) गुन्हेगारीचा स्तर
3)लूटमार, दरोडे, वाहन चोरी
4) अनोळखी व्यक्तींकडून होणारे हल्ले
5) सार्वजनिक ठिकाणी होणारा छळ
6)त्वचेच्या रंगावर, वंशावर किंवा धर्मावर आधारित भेदभाव
7) लिंगभेद आणि त्यामुळे उद्भवणारे गुन्हे
या सर्व निकषांचा विचार करून इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP) दरवर्षी Global Peace Index जारी करते. यामध्ये मिळालेली क्रमवारी पर्यटन, गुंतवणूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते.
Comments are closed.