फडणवीस नव्हे, जळणवीस; आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, जरांगे-पाटील यांचा निर्धार

फडणवीसांनी मराठ्यांनाच नव्हे तर धनगरांना व लाडक्या बहिणींनाही फसवले हे आता सगळ्यांना उमजलं आहे. फडणवीस नव्हे ते जळणवीस आहेत, असा हल्ला आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारवर केला. आपण ओबीसीतूनच आरक्षण घेणार, एकाही मराठ्याला त्रास झाला तर फडणवीस साहेब तुमचं करिअर उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, असा इशारा त्यांनी आज मांजरसुंबा येथील सभेत दिला.
मराठा आरक्षणासह नऊ मागण्यांसाठी 29 ऑगस्टपासून मराठा समाजाचे मुंबईत आंदोलन सुरू होत आहे. 27 तारखेला मनोज जरांगे अंतरवाली येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मांजरसुंबा येथे सभा झाली. यावेळी जरांगे म्हणाले, ‘मराठ्यांनो, डोकं शांत ठेवून वागा, सरकारने षड्यंत्र रचले आहे. सरकारचेच लोक सरकारला शिव्या देऊन दगडफेक करू शकतात, आपण पळापळी करायची नाही. जागचं हलायचं नाही. दगडफेक करणाऱ्याला पोलिसांच्या हवाली करायचं. हा आपला शेवटचा संघर्ष आहे, मागे फिरायचे नाही, घरी कोणी थांबायचे नाही. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही हा फायनल निर्णय आहे’.
येथेची हत्या ही मध्यांतरातील बैठक आहे
आंतरवाली सराटी येथे सोमवारी गोदा पट्टय़ातील 123 गावांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
…तर भाजपच्या आमदार, मंत्र्यांना फिरू देऊ नका
आंदोलनासाठी आलेल्या मराठ्याच्या एकाही पोराला डिवचलं तर गावात राहिलेल्या महिलांनी गप्प बसायचे नाही. भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांना गावात फिरू द्यायचे नाही. शांततेत सकाळी उठून भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर जाऊन बसायचे, आमच्या भगिनीने हातात चप्पल घेतली की मग मंत्रीही घराच्या बाहेर पडत नसतो, असे जरांगे पाटील म्हणाले.
Comments are closed.