नोएडामध्ये 32 व्या मजल्यावरून पडल्यानंतर तरुणांचा मृत्यू होतो

2 दिवसांपूर्वी बेपत्ता असल्याची नोंद झाली होती तक्रार

वृत्तसंस्था/ नोएडा

नोएडा या शहरातील सुपरनोव्हा सोसायटीत 32 व्या मजल्यावरून संशयास्पद स्थितीत पडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. हा युवक एका सेवानिवृत्त आयआरएस अधिकाऱ्याचा मुलगा होता. पोलिसांनी मृतदेहावर उत्तरीय तपासणी करवत तो कुटुंबीयांकडे सोपविला आहे.

तर संबंधित युवक बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांकडे नोंदविली होती. मृत युवक नोएडा येथील प्रख्यात विद्यापीटात कायद्याचे शिक्षण घेत होता. कुटुंबीयांनी ओरडल्यावर नाराज होत तो एका महिलेसोबत नोएडा येथे आला होता. युवकाच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहे. मृत युवकाचे नाव रवि शर्मा असून तो 20 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाला होता. रविचे घरात भांडण झाले होते. यानंतर तो नाराज होत घरातून बाहेर पडला होता. यानंतर नोएडा येथील सुपरनोव्हा सोसायटीत तो आला होता. तेथे त्याच्या ओळखीच्या एका महिलेचा स्टुडिओ आहे. ही महिला स्टुडिओतून बाहेर पडल्यावरही रवि तेथेच थांबला होता. यानंतर त्याचा मृतदेह इमारतीच्या खाली पडलेला आढळून आला.

Comments are closed.