शाकिब अल हसनने रचला मोठा इतिहास! 500 विकेट्स घेत अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटर

शकीब अल हसन रेकॉर्डः बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने रविवारी (24 ऑगस्ट) मोठा इतिहास रचला. त्याने आपल्या टी20 कारकिर्दीत 500 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. हा पराक्रम त्याने सीपीएल 2025 (कॅरिबियन प्रीमियर लीग)च्या 11व्या सामन्यादरम्यान केला. तो जगातील असा पहिला खेळाडू बनला आहे, ज्याच्या नावावर टी20 मध्ये 500 विकेट्स आणि 7,000 पेक्षा जास्त धावा आहेत. (Shakib Al Hasan 500 T20 wickets)

रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात एसकेएन पॅट्रियट्सने प्रथम फलंदाजी करताना 133 धावा केल्या. अँटिगुआ आणि बार्बुडा फाल्कन्ससाठी शाकिब अल हसनने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 11 धावा दिल्या आणि 3 विकेट्स घेतल्या. त्याने मोहम्मद रिझवान, काईल मेयर्स आणि नवीन बिदेसी यांना आपले शिकार बनवले.

38 वर्षीय शाकिब अल हसनने रविवारी एकूण 3 विकेट्स घेतल्या, त्यामुळे आता त्याच्या टी20 मध्ये एकूण 502 विकेट्स झाल्या आहेत. त्याने रिझवानच्या रूपात 500वी टी20 विकेट पूर्ण केली. 500 टी20 विकेट्स घेणारा तो बांगलादेशचा पहिला आणि जगातील पाचवा गोलंदाज बनला आहे.

टी20 मध्ये 500 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची यादी (टी 20 क्रिकेट रेकॉर्ड)
राशिद खान (अफगाणिस्तान) – 660
ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडिज) – 631
सुनील नरेन (वेस्ट इंडिज) – 590
इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका) – 554
शकीब अल हसन (बांगलादेश) – 502

या रेकाॅर्डसोबतच शाकिबने आणखी एक मोठा इतिहास रचला. तो टी20 क्रिकेटमध्ये 500 पेक्षा जास्त विकेट्स आणि 7,000 पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. (First player 500 wickets 7000 runs) त्याने 457 टी20 सामन्यांमध्ये 7,574 धावा केल्या आहेत, ज्यात 33 अर्धशतकांचा समावेश आहे. (Shakib Al Hasan cricket stats)

Comments are closed.