इंग्लंडमध्ये 'या' पाकिस्तानी फलंदाजाने केला कहर! शेवटच्या 5 डावात ठोकली इतकी शतकं
इमाम-उल-हॅक शतक: पाकिस्तानचा स्टार फलंदाज इमाम उल हक सध्या पाकिस्तानी टी20 संघातून बाहेर आहे. यामुळे तो सध्या काउंटी क्रिकेटमध्ये यॉर्कशायर संघासाठी दमदार खेळ दाखवत आहे आणि त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. यॉर्कशायर संघाने ससेक्स संघाला 4 विकेटने हरवले आहे. या सामन्यात ससेक्सने प्रथम फलंदाजी करताना 284 धावा केल्या. यानंतर इमामच्या शतकाच्या जोरावर यॉर्कशायरने हे लक्ष्य सहज गाठले. (Imam Ul Haq century Yorkshire)
सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या इमाम उल हकने सुरुवातीपासूनच सावध फलंदाजी केली. त्याने 105 चेंडूत 106 धावा केल्या. दरम्यान त्याने 10 चौकारांसह 3 षटकार ठोकले. त्याच्याशिवाय जेम्स व्हार्टनने 85 धावांचे आणि मॅथ्यू रेविसने 39 धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच यॉर्कशायर संघाने शानदार विजय मिळवला.
ससेक्स संघासाठी ओली कार्टरने 94 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय डॅमी लॅबने 53 आणि जॉन सिम्पसनने 65 धावा केल्या. संघाने निर्धारित 50 षटकात एकूण 284 धावा केल्या होत्या. पण नंतर गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. (Yorkshire vs Sussex)
इमाम उल हकने याआधी लंकाशायरविरुद्ध 117 धावांची आणि नॉर्थेंट्सविरुद्ध 159 धावांची खेळी केली होती. तो किती दमदार फॉर्ममध्ये आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की त्याने गेल्या 5 डावांमध्ये तिसरे शतक ठोकले आहे. याशिवाय त्याने मिडिलसेक्स आणि वारविकशायरविरुद्ध अर्धशतके झळकावली होती.
इमाम उल हक पाकिस्तानी संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने 24 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 1,586 धावा केल्या आहेत. याशिवाय 75 वनडे सामन्यांमध्ये त्याने 3,152 धावा कुटल्या आहेत. तर, 2 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 21 धावा केल्या आहेत. (Imam Ul Haq International Cricket Stats)
Comments are closed.