पर्वतांच्या कुशीत सुरू होणार ‘मना’चे श्लोक’ चा प्रवास; १० ॲाक्टोबरला होणार प्रदर्शित – Tezzbuzz

आयुष्य हा एक प्रवास आहे, कधी सोपा, कधी कठीण, तर कधी भावनांनी भरलेला. या प्रवासाला पर्वतांची साथ आणि मनाच्या नात्यांची ऊब मिळाली तर तो प्रवास खास ठरतो. अशीच एक वेगळी गोष्ट ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात मनवा आणि श्लोक यांचा प्रवास दाखवला असून, त्यात त्यांची नाती, विचार आणि स्वप्नं यांचा सुंदर संगम दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये ते दोघे पर्वतांच्या दिशेने चालत निघाल्याचं दिसत असून, त्यांचे पाठमोरे रूप या प्रवासाच्या कहाणीची उत्सुकता वाढवतं. या प्रवासात त्यांचं प्रेम फुलणार का, त्यांच्या सोबत आणखी कोण असेल, ते काय मागे सोडून आले आहेत आणि डोंगर त्यांना कोणत्या नव्या दिशेने नेत आहेत, हे जाणून घेणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे.

या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब यांची भूमिका आहे.

‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, याचे लेखन व दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा असून, हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स व नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांनी सादर केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

कढीपत्ता’मध्ये रिद्धी कुमार बनली भूषण पाटीलची नायिका ७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित…

Comments are closed.