थरारक सामना! आशिया कपमध्ये तीन वेळा आमनेसामने येणार भारत-पाकिस्तान

आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला 14 सप्टेंबरला रंगणार आहे. भारतीय सरकारने नुकतंच स्पष्ट केलं आहे की इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये टीम इंडिया पाकिस्तानचा बहिष्कार करणार नाही. त्यामुळे या दोन्ही संघांची आशिया कपमध्ये टक्कर होणे निश्चित झाले आहे.

मात्र, आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर केवळ एकदाच नव्हे तर तब्बल तीन वेळा होऊ शकते. सुरुवातीला हे दोन्ही संघ लीग स्टेजमध्ये आमनेसामने येणार आहेत. त्यानंतर सुपर-4 फेरीतही इंडिया-पाक सामना होणार, असे जवळपास ठरलेले मानले जात आहे . आता जर दोन्ही संघांनी उत्तम खेळ दाखवला, तर 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यातही भारत-पाकिस्तानची धडक होण्याची दाट शक्यता आहे.

Comments are closed.