ट्रेंड – त्याने प्रपोज करताच ज्वालामुखी फुटला!

प्रेमाचे काही क्षण इतके खास असतात की ते विसरणे अशक्य होऊन जाते. असाच एक अनोखा आणि जादुई क्षण ग्वाटेमालामध्ये पाहायला मिळाला. जेव्हा एका माणसाने त्याच्या प्रेयसीला प्रपोज केले आणि त्याच वेळी मागे ज्वालामुखी फुटला. जणू काही निसर्गानेही त्यांच्या प्रेमाला मान्यता दिली. निसर्गाच्या आविष्कारामुळे त्या व्यक्तीचे प्रपोजल खूपच खास ठरले. हा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात शेअर होतोय. व्हायरल व्हिडीओ जस्टिन ली आणि त्याची प्रेयसी मॉर्गन यांचा आहे. आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी जस्टिनने ग्वाटेमाला येथील अकातेनांगो ज्वालामुखीचे ठिकाण निवडले आणि तिथेच त्याने गुडघ्यावर बसून त्याच्या प्रेयसीला प्रपोझ केले. पण त्याचदरम्यान, जवळच असलेल्या फ्यूगो ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि लावा तसेच धुराचे लोट आकाशात उडू लागले.
Comments are closed.