आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा, पायलला सुवर्ण; मनूचे पदक हुकले!

न ऑलिम्पिक पदके जिंकलेल्या हिंदुस्थानच्या मनू भाकरला सोमवारी आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात पदकाने हुलकावणी दिली. तिला स्पर्धेत चौथा क्रमांक मिळाला. मात्र ज्युनियर गटात पायल खत्री हिने सुवर्ण, तर नाम्या कपूर व तेजस्विनी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.

ज्युनियर गटात हिंदुस्थानचा डंका

महिलांच्या ज्युनियर गटातील 25 मीटर पिस्टलच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानचा डंका बघायला मिळाला. पायल खत्रीने 36 गुणांसह सुवर्ण पदक पटकावले. नाम्या कपूर (30) हिने रौप्य आणि तेजस्विनी (27) हिने कांस्य पदक जिंकले. या तिघींनी मिळून 1700 गुणांची कमाई करत हिंदुस्थानला सांघिक स्पर्धेतही रौप्यपदक जिंकून दिले. कोरियाने सुवर्ण आणि कझाकिस्तानने कांस्य जिंकले. क्वालिफिकेशन फेरीत नाम्या आणि तेजस्विनीने पहिले दोन क्रमांक मिळवले होते, तर पायल सहाव्या क्रमांकावर होती.

सीनियर गटात चीनच्या यूयू झांगने सुवर्ण, तर जियारूइशुआन शियाओने रौप्यपदक पटकावले. मनू, ईशा आणि सिमरनप्रीत काडब्ल्यूर बरार या हिंदुस्थानी त्रिकुटाने 1749 गुणांसह सांघिक कांस्यपदक जिंकले. चीन आणि दक्षिण कोरियाने पहिले दोन क्रमांक पटकावले. क्वालिफिकेशनमध्ये ईशा सिंग अव्वल होती, तर मनू चौथ्या स्थानी राहिली होती. मात्र अंतिम फेरीत ईशा सिंग सहाव्या स्थानावर राहिली. मनूने 25 गुणांची कमाई केली आणि ती तिसऱया क्रमांकावर राहिलेल्या व्हिएतनामच्या तू विन्ह त्रिन्हपेक्षा चार गुणांनी मागे राहिली.

Comments are closed.