हे 4 गोलंदाज ज्यांच्यापासून थरथरत होता चेतेश्वर पुजारा; नावे ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

भारतीय कसोटी संघाचा “भिंत 2.0” म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजाराने अखेर आंतरराष्ट्रीयच नव्हे तर प्रोफेशनल क्रिकेटलाही रामराम केला आहे. रविवारी (24 ऑगस्ट) पुजाराने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. त्याने भारतासाठी 103 कसोटी सामन्यात प्रतिनिधत्तव केलं.

दरम्यान, लांब काळ भारतीय कसोची संघाचा आधारस्तंभ ठरलेला हा फलंदाज आपल्या कारकिर्दीतील सर्वात अवघड गोलंदाजांविषयीही बोलला आहे. आश्चर्य म्हणजे त्यात कगिसो रबाडा, मिचेल स्टार्क किंवा जोश हेजलवुड यांची नावे नव्हती.

पुजाराने घेतलेले चार आव्हानात्मक गोलंदाजांचे नाव:

डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)
मॉर्ने मॉर्केल (दक्षिण आफ्रिका)
जेम्स अँडरसन (इंग्लंड)
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)

यावेळी बोलताना पुजाराने सांगितले की, “माझ्या संपूर्ण करिअरमध्ये हेच चार गोलंदाज सर्वात मोठं आव्हान होते.” विशेष म्हणजे पॅट कमिन्सने कसोटी क्रिकेटमध्ये त्याला तब्बल 8 वेळा बाद केलं आहे.

चेतेश्वर पुजाराने भारतासाठी 103 कसोटी सामने खेळले आणि 7195 धावा केल्या. तो भारताचा या फॉरमॅटमधील आठवा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, विराट कोहली, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली अशी नावे आहेत.

पुजाराने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जून 2023 ( वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल) मध्ये खेळला. त्या सामन्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि त्यानंतर त्याला पुनरागमनाची संधी मिळाली नाही. डोमेस्टिक क्रिकेटमधून परत येण्याचा प्रयत्न करूनही निवडकर्त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली.

Comments are closed.