अजूनही महापालिका निवडणूक आणि ओबीसी आरक्षणाची घोषणा नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

काँग्रेस मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या बाजूने आहे असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही महापालिका निवडणूक आणि ओबीसी आरक्षणाची घोषणा नाही अशी टीकाही सपकाळ यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम आणि ओबीसी आरक्षणाची घोषणा झालेली नाही. त्यांनी सांगितले की काँग्रेस या काळात संघटना मजबूत करण्यावर आणि प्रादेशिक पातळीवर आढावा घेण्यावर भर देत आहे.सपकाळ यांनी स्पष्ट केले की काँग्रेस मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. त्यांनी सांगितले की पक्ष जातनिहाय जनगणना आणि आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा हटवण्याची मागणी करत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर आरोप करताना सांगितले की भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणूक घोटाळा केला राहुल गांधींनी यासंबंधी पुरावेही सादर केले आहेत. तसेच लोकशाही धोक्यात आहे आणि ती वाचवणे गरजेचे आहे. काँग्रेस महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून ‘‘वोट चोर, गादी सोड’’ या घोषणेला बळकट करेल अशी प्रतिक्रिया अमित देशमुख यांनी दिली.

Comments are closed.