हरतालिका व्रताच्या पाठवा मंगलमय शुभेच्छा आणि ठेवा स्टेटस
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते. महिलांसाठी या सणाचे विशेष महत्त्व असते. कारण विवाहित महिला सौभाग्य, ऐश्वर्य आणि सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात. तर अविवाहित मुली चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज हरतालिकेचा उपवास आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात असे पारंपरिक सण आपल्याला कुटुंबाशी जोडतात आणि आयुष्यात सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करतात. म्हणूनच या शुभदिनी आप्तेष्टांना शुभेच्छा दिल्या जातात. आज आम्ही खास या सणानिमित्त तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास हरतालिका सणासाठी खास शुभेच्छा, ज्या तुम्ही इतरांसोबत शेअर करू शकता.
पार्वतीसारखे प्रेम लाभो
शिवसारखीचे फायदे
हरितालिक तृतीयेच्या
हार्दिक शुभेच्छा!
भाद्रपदातील हरितालिकेचा पवित्र सण
शिव-पार्वती भक्तीत भक्त झाले तल्लीन
शिव-पार्वती पूर्ण करतील मनातील इच्छा
हरितालिकेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
हरितालिकेचा आनंद
तुमच्या आयुष्यात टिकून राहो
हिच इश्वरचरणी प्रार्थना
हरितालिकेच्या शुभेच्छा !
माता उमाच्या भाळी
जसा शिवाचा पिंजर
उपवर कन्येची प्रार्थना
मिळो मनजोगता वर
हरितालिका तृतीयेच्या
हार्दिक शुभेच्छा!
उत्सव महिलांच्या श्रद्धेचा
मराठी परंपरेचा, सौभाग्य अन् हरतालिकेचा
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
हरतालिका सण हा आला सौभाग्याचा,
पार्वतीप्रमाणे आयुष्यात येवो भगवान शंकर सगळ्यांच्या,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
हरतालिका आणू दे सर्वांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि सुख
सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!
हेही पाहा –
Comments are closed.