Pune – आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून हल्ल्याचा प्रयत्न

भाजपचे आमदार सदाभाऊ खोत हे फुरसुंगी परिसरातील ‘द्वारकाधीश’ गोशाळेत आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी गोरक्षकांनी खोत यांच्या अंगावर धावून जात हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, आमदार खोत यांच्यावर कसलाही हल्ला झाला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सिंहगड पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील जनावरे द्वारकाधीश गोशाळेत पाठविली होती. त्या अनुषंगाने संबंधित जनावरे तक्रारदारांना परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जनावरे गोशाळेत आहेत की नाहीत, हे पाहण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांसमवेत त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी जनावरे तेथे नसल्यामुळे आमदार सदाभाऊ खोत हे माध्यमांसोबत संवाद साधत होते. त्यावेळी गोरक्षकांनी त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा आग्रह केला होता. मात्र, कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक खांडे, एपीआय जाधव यांनी परिस्थिती हाताळून खोत यांना बाजूला नेले.
Comments are closed.