सदाभाऊ खोत यांच्यानंतर आता गोपीचंद पडळकरांना भेटला आणखी एक भिडू; संदीप गिड्डे पाटलांसोबत मैत्री
गोपीचंद पडलकर आणि संदीप गिडडे पाटील: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची दोस्ती सर्वदूर चर्चेत आहे. आता गोपीचंद पडळकर आणि भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे-पाटील (Sandeep Gidde Patil) यांची मैत्रीरुपातील नवीन जोडी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात उदयास आली. यामागे राजकीय भाषेत सांगायचे झाले, तर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यानंतर संदीप गिड्डे पाटील यांच्या रूपाने भाजपचे एक नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न आहे.
कवठेमहांकाळमध्ये भाजप आणि सर्वोत्तम फाऊंडेशन यांच्या विद्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दोस्ती दहीहंडी’ चे आयोजन करण्यात आले होते. या ‘दोस्ती दहीहंडी’ च्या निमित्ताने पडळकर आणि संदीप गिड्डे-पाटील यांची ही मैत्री समोर आली. कवठेमहांकाळ आणि जत या शेजारी शेजारी असलेल्या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही आमचा मैत्रीचे नवे पर्व सुरु करत असल्याचे गोपीचंद पडळकर आणि संदीप गिड्डे-पाटील यांनी सांगितलं.
संदीप गिड्डे पाटील यांच्या रूपाने आणखी एक नवीन जोडीदार भेटला-
संदीप गिड्डे-पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील आणि गोपीचंद पडळकर सध्या जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विकासाच्याबाबतीत दोन्ही तालुक्यांची परिस्थिती आतापर्यंत एकच होती. त्यामुळे आम्ही आता हातात हात घालून कवठेमंकाळ आणि जतचा बरोबरीने कसा विकास साधता येईल. यासाठी आमची मैत्री काम करेल असं दोघांनीही स्पष्ट केले आहे. मात्र या निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर यांना सदाभाऊ खोत यांच्याबरोबर आता संदीप गिड्डे पाटील यांच्या रूपाने आणखी एक नवीन जोडीदार भेटलाय असेच म्हणता येईल.
जयकुमार गोरे काय म्हणाले?
कवठेमहांकाळ मध्ये ‘दोस्ती दहीहंडी’च्या स्टेजवर भाषण सुरु असतानाच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मुख्यमंत्र्यांचा फोन आला. भाषण थांबवून गोरेनी मुख्यमंत्र्यांचा फोन घेत या दहीहंडीला आणि आमदार गोपीचंद पडळकर आणि संदीप गिड्डे पाटील यांच्या मैत्रीपर्वाला शुभेच्छा दिल्याचं सांगितले. तसेच कवठेमहांकाळ आणि जत तालुक्याच्या विकासासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि संदीप गिड्डे पाटील एकत्र आल्याबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही शुभेच्छा देत पडळकर आणि संदीप गिड्डे पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष प्रेम असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही तालुक्याच्या विकासासाठी निधी अजिबात कमी पडणार नाही. तसेच माझ्या खात्यातुन जत आणि कवठेमहांकाळसाठी जितकं अधिक देता येईल ते देण्याचा माझा प्रयत्न असेल असे मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय.
गोपीचंद पडळकर आणि संदीप गिड्डे पाटील एकत्र येण्यामागची समीकरणे काय?
– गोपीचंद पडळकर हे सध्या जत तालुक्याचे आमदार आहेत तर संदीप गिड्डे पाटील कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळे गावचे सुपुत्र आहेत.
– जत आणि कवठेमहांकाळ हे शेजारचे तालुके, दोन्ही तालुके आतापर्यंत विकासापासून वंचित
– जत तालुक्यातील उमदी मध्ये पडळकर यांनी एमआयडीसी मंजूर केलीय तर कवठेमहांकाळ तालुक्यात ड्रायपोर्ट करण्यासाठी पडळकर आणि संदीप गिड्डे पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.
– राजकीय भाषेत सांगायचे झाले तर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यानंतर संदीप गिड्डे पाटील यांच्या रूपाने भाजपचे एक नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न…
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.