गणेशोत्सवामुळे मुंबईत आंदोलनास परवानगी नाही; हायकोर्टाने मनोज जरांगे यांना बजावली नोटीस

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. याच पार्श्वभूमीवर एमी फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती आलोक अराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली आहे.

मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यामुळे मनोज जरांगे यांना मुंबईबाहेर नवी मुंबई किंवा खारघर येथे आंदोलनास परवानगी देण्याची मुभा आहे, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तसेच न्यायालयाने मनोज जरांगे यांनाही नोटीस बजावत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. याबाबत आता पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.

Comments are closed.