Dog Bite Vaccine: कुत्रा चावल्यानंतर इंजेक्शन किती वेळात घ्यावे?
देशभरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कुत्र्यांनी लोकांना चावल्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांमध्ये सर्वात मोठा धोका म्हणजे रेबीज हा घातक आजार. योग्य वेळी इंजेक्शन न घेतल्यास हा आजार मेंदू, हृदय आणि मज्जासंस्था बंद पाडतो आणि शेवटी मृत्यूही होऊ शकतो. म्हणूनच कुत्रा चावल्यानंतर नेमकं काय करावं, किती तासांत इंजेक्शन घ्यावं, हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. (dog bite injection timing rabies treatment)
कुत्रा चावल्यावर जखमेची तीव्रता लक्षात घेऊन उपचार केले जातात. साधारण तीन टप्प्यांमध्ये ही विभागणी केली जाते.
1.पहिला टप्पा – फक्त त्वचा उघडली असेल
•अशावेळी मिरची, हळद यासारखे घरगुती उपाय अजिबात करू नयेत.
•जखम वाहत्या पाण्याने नीट धुवावी आणि अँटीसेप्टिक क्रीम लावावी.
2.दुसरा टप्पा – कुत्र्याचे दात त्वचेत शिरले असतील
•जखम स्वच्छ पाण्याने धुवून अँटीसेप्टिक औषध (जसे की बीटाडाईन) लावणे आवश्यक आहे.
•रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा वापर करून संसर्गाचा धोका कमी केला जातो.
3.तिसरा टप्पा – मांस फाटलेले किंवा खोल जखम असेल
•अशावेळी धनुर्वात (टिटॅनस) इंजेक्शन घेणे आवश्यक आहे.
•रुग्णाला अँटीबायोटिक्स आणि आवश्यकतेनुसार टाके घालण्याची गरज भासते.
इंजेक्शन किती वेळेत घ्यावे?
कुत्रा चावल्यानंतर शक्य तितक्या लवकर इंजेक्शन घेणे अत्यावश्यक आहे. पहिला डोस तात्काळ दिला जातो, ज्याला झिरो डोस म्हणतात. त्यानंतर 0, 3, 7, 21 आणि आवश्यक असल्यास 28 व्या दिवशी लसीकरण केले जाते. हे पाच डोसचे शेड्यूल जीवघेण्या रेबीजपासून संरक्षण देते.
का घ्यावे त्वरित उपचार?
विलंब झाल्यास विषाणू मज्जासंस्थेत पोहोचतो आणि मग उपचाराचा परिणाम होत नाही.
रेबीजचा आजार एकदा झाल्यावर त्यावर कोणताही उपचार नाही, त्यामुळे इंजेक्शन हेच जीवन वाचवण्याचे साधन आहे.
भारतात दररोज हजारो लोकांना कुत्रे चावतात. यातील अनेक रुग्ण उशिरा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याने त्यांचा जीव धोक्यात येतो.
कुत्रा चावल्यानंतर घाबरण्यापेक्षा त्वरित उपाय करणं अधिक महत्त्वाचं आहे. जखम स्वच्छ धुऊन, अँटीसेप्टिक लावून, त्वरित हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन घेणं हेच आयुष्य वाचवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.
Comments are closed.