सरफराज खानचा जबरदस्त फॉर्म कायम! 8 दिवसात दुसरे शतक झळकावत भारतीय संघात पुनरागमनासाठी ठोकला मजबूत दावा
सरफराज खान शतक: भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर सरफराज खानने चांगली कामगिरी केली होती, पण त्यानंतरही जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला, तेव्हा सरफराजचे नाव संघात नव्हते. दरम्यान, जेव्हा जेव्हा सरफराजला संधी मिळाली आहे, तेव्हा त्याने शतकांची मालिकाच लावली आहे. विशेष म्हणजे 8 दिवसांच्या अंतरात सरफराज खानचे हे दुसरे शतक आहे. या कामगिरीने त्याने पुन्हा एकदा भारतीय संघामध्ये पुनरागमनाचा दावा ठोकला आहे. (Sarfaraz Khan comeback)
सरफराज खान पुन्हा एकदा धावा करण्याच्या आपल्या मिशनमध्ये व्यस्त आहे. तो सध्या बुची बाबू टूर्नामेंटमध्ये खेळत आहे. (Buchi Babu Tournament) हरियाणाविरुद्ध मुंबईकडून खेळताना सरफराजने शतक ठोकले. विशेष म्हणजे त्याने हे शतक फक्त 99 चेंडूंमध्ये पूर्ण केले. म्हणजेच, तो कसोटी नाही तर वनडे शैलीत फलंदाजी करत होता. गंमत म्हणजे, सरफराजने बेधडकपणे षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने आणखी 11 धावा केल्या आणि 111 धावांवर तो बाद झाला. (Sarfaraz Khan Century)
या स्पर्धेत सरफराजने 18 ऑगस्ट रोजी 1 शतक झळकावले होते. त्यानंतरचे हे त्याचे दुसरे शतक आहे. सरफराजने हे दोन्ही शतक आक्रमक शैलीत केले असून भारतीय संघामध्ये आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. जरी पुढील महिन्यात भारतीय संघ आशिया कप खेळणार असला, तरी पुढील कसोटी मालिका फार दूर नाही. ऑक्टोबरमध्येच वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे आणि या दौऱ्यात 2 कसोटी सामने खेळले जातील. पहिला सामना 2 ऑक्टोबरपासून सुरू होईल. म्हणजेच, यासाठी भारतीय संघाची निवड सप्टेंबरच्या शेवटी होईल. आता पाहायचे आहे की, अजित अगरकर आणि इतर निवड समिती सदस्य सरफराजला पुन्हा संधी देतात की दुर्लक्ष करतात.
भारतासाठी त्याने 6 कसोटी सामन्यांच्या 11 डावांमध्ये 371 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान त्याची सरासरी 37.10 असून तो 74.94च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 150 आहे. पण, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तर सरफराजची सरासरी 65 पेक्षा जास्त आहे. आता वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान त्याचे पुनरागमन होते का, हे पाहणे महत्त्वाचे आणि उत्सुकतेचे ठरेल. (India tour of West Indies)
Comments are closed.