Asia Cup: विराट कोहली की बाबर आझम! कुणी केल्या आशिया कप इतिहासात सर्वाधिक धावा?

आशिया कपची सुरुवात होणार आहे. यावेळी हा स्पर्धा टी20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. विराट कोहलीने टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तो यंदा भारताच्या आशिया कपसाठीच्या संघात नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानी खेळाडू बाबर आझमलाही आशिया कपसाठीच्या पाकिस्तान संघात स्थान मिळालेले नाही. तसेच या वेळेस टी20 संघातून मोहम्मद रिझवानलाही बाहेर ठेवण्यात आले आहे.

विराट कोहली आणि बाबर आझम यांच्या आशिया कपमधील आकडेवारीत मोठा फरक आहे. विराटने आशिया कपच्या स्पर्धेत आतापर्यंत 26 सामने खेळले आहेत, तर बाबरने फक्त 16 सामने खेळले आहेत. आशिया कपमधील विराटची आकडेवारी खूपच दमदार आहे. आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळला गेला असो किंवा टी20 मध्ये, विराटने प्रत्येक वेळी उत्कृष्ट खेळ दाखवला आहे.

विराट कोहलीच्या आशिया कपमधील वनडे आकडेवारीकडे पाहिल्यास, विराटने 16 सामन्यांत 61.83 च्या सरासरीने 742 धावा केल्या आहेत. यात चार शतकं आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. कोहलीचा आशिया कप ODI मधील सर्वोच्च स्कोर 183 धावा आहे. आशिया कप आतापर्यंत फक्त दोन वेळाच, 2016 आणि 2022 मध्ये टी20 फॉरमॅटमध्ये खेळवला गेला आहे. या दोन्ही स्पर्धा मिळून कोहलीने 10 सामन्यांत 85.80 च्या सरासरीने 429 धावा केल्या आहेत. विराटचा आशिया कप टी20 मधील सर्वोच्च स्कोर नाबाद 122 धावा आहे.

बाबर आझमने आशिया कप वनडेमध्ये 10 सामन्यांत 40.33 च्या सरासरीने फक्त 363 धावा केल्या आहेत. बाबरचा ODI आशिया कपमधील सर्वोच्च स्कोर 151 धावा आहे. आशिया कपमध्ये विराट आणि बाबरच्या धावांच्या सरासरीत मोठा फरक आहे. कोहलीने आशिया कपमध्ये जवळपास 62 च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर बाबरची सरासरी 40 च्या आसपास आहे. बाबरने टी20 फॉरमॅटमध्ये फक्त एकदाच, 2022 मध्ये आशिया कप खेळला आहे. मात्र या स्पर्धेत हा पाकिस्तानी खेळाडू काही विशेष कामगिरी करू शकला नाही. बाबरने 6 सामन्यांत 11.33 च्या सरासरीने केवळ 68 धावा केल्या.

Comments are closed.