सत्ताधर्‍यांचा अजब फतवा, महाराष्ट्रात खेकडे पकडण्यावर बंदी

सर्वदूर पाऊस झाला की, ओढे, नाले भरभरून वाहू लागतात. ग्रामीण दुर्गम भागातील लोक आपसुकच ओढ्या, नाल्याच्या कपारीत खेकड्यांची शिकार करतात. मात्र आता या शिकारीवरही सरकारने बंदी घातली आहे. आधी मांस खाऊ नका, आता खेकडे खाऊ नका असे अजब फतवे सरकार रोज बजावत आहे. राज्यात डोंगराएवढ्या समस्या आणि प्रश्न असताना सरकार मात्र हास्यास्पद निर्णय घेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. तसेच ज्या नागरिकांच्या आहारामध्ये खेकड्यांचा समावेश असतो त्यांनी सरकारच्या या तुघलकी निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.

नदी, नाले आणि तलावातील गोड्या पाण्यात या दिवसांमध्ये खेकड्यांचे प्रजनन सुरू होते. काही व्यक्ती या खेकड्यांची तस्करी करत असल्याने खेकड्यांचे प्रजनन पूर्ण होत नाही. खेकड्यांना प्रजनन हंगामात पकडणे हे चुकीचे आहे. अशाने खेकड्यांची प्रजाती नष्ट होईल. खेकड्यांची तस्करी होत असून ती तस्करी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांनी थेट खेकडे पकडण्यावर बंदी घातली आहे.

पाऊस पडल्यानंतर साहजिकच नदी, नाल्यांना पूर येतो, तलावही खचाखच भरतात अशावेळी आपसुकच मोठ्या प्रमाणावर गोड्या पाण्यामध्ये खेकडे सापडतात. ग्रामीण भागात खेकड्यांची शिकार केली जाते. वर्षानुवर्षे खेकडा हा महत्वाचा आहार मानला जातो. मात्र आता सहज मिळणारे खेकडेही दुरापास्त होणार आहेत. खेकडे पकडण्यावर बंधन घातल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. सरकार कधी मास खाण्यवर बंदी आणतं तर कधी खेकडे पकडण्यावर निर्बंध घातले जातात. महाराष्ट्रात समस्या आणि प्रश्नांचे डोंगर उभे असताना हे सरकार मात्र थिल्लरपणे फतवे काढून सामान्य नागरिकांची गळचेपी करत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

खेकडा औषधी, बारा आजारावर उपायकारक

गाव खेड्यात ओढ्या, नद्यावर पुराच्या वेळी आलेल्या पाण्यात खेकडे पकडले जातात. काही आजारावर चांगल औषध असल्याचे मानले जाते, म्हणून लोक खेकडे खातात. वेगवेगळ्या बारा आजारावर खेकडा हा गुणकारी आहे. त्यातून पकडताना मादी आणि नर ओळखणे शक्य नसते त्यामुळे असा खेकडे पकडण्यास बंदीचा निर्णय योग्य नसल्याचे मत्स्य व्यवसाय करणार्‍या मंडळीचे म्हणणे आहे. हा निर्णय पर्यावरणाच्या नावाखाली मच्छीमार लोकांवर अन्याय करणारा आहे असेही मच्छीमार संघटनेचे तुकाराम वानखेडे यांनी म्हटले आहे.

Comments are closed.