100 year old woman fitness: वयाची शंभरी गाठूनही आजी करतायत व्यायाम
वय वाढलं की उत्साह कमी होतो, शरीर साथ देत नाही, ही सर्वसाधारण समजूत आहे. चाळिशी-पन्नाशी ओलांडल्यानंतरच अनेक जण “आता मला व्यायाम झेपणार नाही”, “एवढी दगदग माझ्याकडून होणार नाही” असं म्हणताना दिसतात. पण एक आजीबाई मात्र या समजुतींना पूर्ण खोडून काढतात. (100 year old woman fitness secrets gym workout)
या आजीबाईंचं वय आहे तब्बल 100 वर्षे, आणि तरीही त्या नियमित जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. त्यांचा उत्साह, शिस्त आणि फिटनेस पाहून अनेक तरुणही थक्क होतात. त्यांच्या हालचालींमध्ये अजिबात थकवा जाणवत नाही आणि त्यांनी वयाची शंभरी गाठली आहे, हे कोणी पाहूनही पटणार नाही.
फिटनेससाठी आजींचं नियमबद्ध जीवन
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये या आजीबाई जिममध्ये व्यायाम करताना दिसतात. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी त्यांच्या दीर्घायुष्याचं आणि निरोगी राहण्याचं खरं रहस्य सांगितलं. त्यांचं आयुष्य दाखवून देतं की निरोगी राहण्यासाठी मोठं काही करण्याची गरज नाही, तर साध्या आणि सोप्या गोष्टी सातत्याने करणं महत्त्वाचं आहे.
आजी सांगतात
•त्या दररोज जवळपास 4 किलोमीटर चालतात.
•रोजचा 30 मिनिटांचा व्यायाम हा त्यांचा ठरलेला नियम आहे.
•रात्री वेळेत झोप घेणं त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. त्या रोज रात्री 9.30 वाजता झोपी जातात.
•आहारामध्ये भरपूर भाज्या आणि पौष्टिक पदार्थांना प्राधान्य देतात.
सोप्या सवयींचा मोठा फायदा
या आजींच्या सवयी पाहून स्पष्ट होतं की दीर्घायुष्य मिळवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी मोठा खर्च किंवा वेगळ्या गोष्टींची आवश्यकता नसते. चालणे, व्यायाम, वेळेवर झोप आणि संतुलित आहार एवढंच पुरेसं आहे.
त्यांच्या आयुष्याकडे पाहून हे निश्चितपणे म्हणता येईल की शंभर वर्षं जगणं हे नशीबावर नाही, तर योग्य सवयींवर अवलंबून असतं.
Comments are closed.