युवकांना सरकारी नोकरीची मोठी संधी, BSF मध्ये 1 हजार 121 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
शासकीय नोकरी: सीमा सुरक्षा दलात (BSF) सरकारी नोकरीचे स्वप्न (Job) पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. BSF ने हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर (RO) आणि रेडिओ मेकॅनिक (RM) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया 24 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे आणि इच्छुक उमेदवार 23 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि उमेदवारांना BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in ला भेट देऊन फॉर्म भरावा लागेल. येथे दिलेल्या चरणांद्वारे उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी काय हवी पात्रता?
या भरती मोहिमेत एकूण 1 हजार 12 1 पदांसाठी भरती केली जाईल. या भरतीत सामील होण्यासाठी उमेदवारांना काही किमान शैक्षणिक पात्रता पूर्ण करावी लागेल. उमेदवार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह किमान 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असावा. त्यानंतर उमेदवाराने मॅट्रिकनंतर संबंधित ट्रेडमध्ये दोन वर्षांचे ITI प्रमाणपत्र घेतलेले असावे.
वयोमर्यादा किती?
बीएसएफ हेड कॉन्स्टेबल भरती 2025 साठी वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. सामान्य श्रेणी (अनारक्षित) च्या उमेदवारांचे वय 25 वर्षांपर्यंत असावे. ओबीसी श्रेणीसाठी कमाल वय 28 वर्षे ठेवण्यात आले आहे. एससी आणि एसटी श्रेणीच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव श्रेणींना नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
निवड प्रक्रिया कशी असेल?
पहिला टप्पा: शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
दुसरा टप्पा: संगणक आधारित चाचणी (CBT)
तिसरा टप्पा: कागदपत्र पडताळणी, डिक्टेशन चाचणी आणि परिच्छेद वाचन चाचणी (फक्त आरओ पदासाठी) आणि तपशीलवार/पुनरावलोकन वैद्यकीय तपासणी (DMR/RME)
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in ला भेट द्या.
होम पेजवरील चालू भरतीच्या संधी विभागात जा.
तेथे उपलब्ध असलेल्या “येथे अर्ज करा” लिंकवर क्लिक करा.
प्रथम आवश्यक माहिती भरून नोंदणी करा.
नोंदणी पूर्ण केल्यानंतर, उर्वरित तपशील भरून अर्ज फॉर्म भरा.
आता उमेदवारांनी अर्ज शुल्क भरावे.
शेवटी, उमेदवारांनी भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट सुरक्षित ठेवावी.
दरम्यान, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज प्रक्रिया 24 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 23 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
महत्वाच्या बातम्या:
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, पाच हजाराहून अधिक पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
आणखी वाचा
Comments are closed.