अमेरिकी कंपन्या म्हणजे तुमच्या ‘पिगी बँक’ नाहीत! डिजिटल टॅक्स हटवा, नाहीतर टॅरिफ लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी

जगातील अनेक देशांना टॅरिफचा तडाखा देत सुटलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नवी धमकी दिली आहे. अमेरिकी टेक कंपन्यांवर डिजिटल टॅक्स किंवा डिजिटल सर्व्हिस;टॅक्स लावणाऱया देशांच्या निर्यातीवर आणखी टॅरिफ लावणार, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

गुगलची मूळ कंपनी असलेली अल्फाबेट, मेटा, अॅपल आणि अॅमेझॉन यांसह अनेक अमेरिकी कंपन्या जगभरात व्यवसाय करतात. त्या त्या देशात या कंपन्यांवर डिजिटल टॅक्स आकारला जातो. चीनच्या कंपन्यांना सवलती देऊन अमेरिकी कंपन्यांना टार्गेट करणे हा अन्याय आहे. हे आता थांबले पाहिजे. हा टॅक्स काढून टाकावा अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. टथ सोशल या सोशल मीडिया अकाऊंटवर ट्रम्प यांनी यासंदर्भात सविस्तर पोस्ट लिहिली आहे. अमेरिकी टेक कंपन्यांना पिगी बँक किंवा पायपुसणे समजू नये, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

  • हिंदुस्थानने 2025-26 च्या अर्थसंकल्पातच टेक कंपन्यांवरील हा कर काढून टाकला होता. मात्र ट्रम्प यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाची दखलही घेतली नाही. उलट दंडासह टॅरिफ लावला.

हिंदुस्थान पुन्हा डिजिटल टॅक्स लावणार

ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर जबर टॅरिफ लावल्यामुळे आता मोदी सरकार अमेरिकी टेक कंपन्यांवर पुन्हा डिजिटल टॅक्स लावण्याची शक्यता आहे. सरकारकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Comments are closed.