पंतप्रधान जपान-चीनला भेट देण्यासाठी
विदेश मंत्रालयाने दिली माहिती : हिंद-प्रशांत क्षेत्रात शांततेच्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 29 ऑगस्टपासुन जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणर आहेत. पंतप्रधान मोदींचा शुक्रवारपासून सुरू होणारा दोन दिवसीय जपान दौरा हिंद-प्रशांत क्षेत्र आणि त्याबाहेर शांतता, समृद्धी आणि स्थिरतेबद्दला दोन्ही देशांच्या प्रतिबद्धतेला अधोरेखित करणार आहे. यामुळे आमची मैत्री आणखी मजबूत होईल आणि सहकार्याचे नवे मार्ग खुले होतील असे विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी मंगळवारी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी जपानच्या अधिकृत दौऱ्याकरता रवाना होतील. जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्यासोबत ते 15 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सामील होण्यासठी ते 29-30 ऑगस्ट रोजी जपानमध्ये असतील. पंतप्रधान इशिबा यांच्यासोबत मोदींची ही पहिली वार्षिक शिखर परिषद आहे. मोदींनी यापूर्वी 2018 मध्ये वार्षिक शिखर परिषदेसाठी जपानचा दौरा केला होता. त्यानंतर मोदी हे जपान दौऱ्यावर गेले असले तरीही तो बहुपक्षीय बैठका किंवा अन्य औपचारिक कार्यक्रमांसाठी राहिला आहे. तर आताचा हा दौरा पूर्णपणे भारत आणि जपानदरम्यान द्विपक्षीय अजेंड्याला समर्पित असणार आहे.
उद्योगजगताच्या दिग्गजांशी साधणार संवाद
भारत आणि जपानदरम्यान वार्षिक शिखर परिषद ही टोकियोबाहेर होणार आहे. मोदी हे जपानच्या अनेक राजकीय नेत्यांसोबतही चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे जपानच्या उद्योगजगतातील दिग्गजांसोबत एका व्यापारविषयक कार्यक्रमात सामील होणार आहेत. या भेटींचा उद्देश दोन्ही देशांदरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानविषयक संबंधांना दृढ करणे असल्याची माहिती विदेश सचिवांनी दिली.
विशेष सामरिक संबंध
भारत आणि जपानदरम्यान वार्षिक शिखर परिशाद दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय संवाद व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करते आणि हे भारत-जपान वेशेष रणनीतिक आणि जागतिक भागीदारीच्या अजेंड्याला पुढे नेते. पंतप्रधान मोदी हे यापूर्वी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांदरम्यान पंतप्रधान इशिबा यांना भेटले आहेत. भारत आणि जपान हे दोन्ही देश समान्य मूल्ये, विश्वास आणि रणनीतिक दृष्टीकोन बाळगून आहेत. हे देश आशियाचे दोन अग्रगण्य लोकशाही आणि जगातील आघाडीच्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये सामील असल्याचे वक्तव्य मिसरी यांनी केले.
अनेक नवे पुढाकार
मागील 1 दशकात आमच्या द्विपक्षीय संबंधांची कक्षा आणि महत्त्वाकांक्षा सातत्याने वाढत आहे आणि आत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण अन् सुरक्षा, विज्ञान अन् तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा अन् गतिशीलता, लोकांशी संपर्क अणि दोन्ही देशांमधील जिवंत सांस्कृतिक बंध सामील आहे. याचमुळे 15 वी शिखर परिषद दोन्ही पंतप्रधानांना या संबंधांची समीक्षा करणे, विविध क्षेत्रांमधील प्रगतीचा आढावा घेणे आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रीय तसेच जागतिक मुद्द्यांवर विचारांचे आदान-प्रदान करण्याची संधी प्रदान करणार आहे. या संबंधांमध्ये आणखी लवचिकता आणणे आणि संधींचा लाभ घेण्यासाठी अनेक नवे पुढाकार सुरू करण्याची ही संधी असेल असे उद्गार विदेश सचिवांनी काढले.
पंतप्रधान मोदींचा चीन दौरा
पंतप्रधान मोदी हे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या निमंत्रणावर 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सामील होण्यासाठी तियानजिनचा दौरा करतील. एससीओत भारतासह बेलारुस, चीन, इराण, कजाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझ्बेकिस्तान सामील आहे. एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांकडून काही द्विपक्षीय बैठकांमध्ये भाग घेतला जाण्याची शक्यता असल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
Comments are closed.