2025 आशिया कपच्या 8 संघांची ICC रँकिंग जाहीर,पाकिस्तानची दयनीय अवस्था!
आशिया कपमध्ये पहिल्यांदाच 8 संघ ट्रॉफीसाठी आपली दावेदारी सादर करणार आहेत. आतापर्यंत हा स्पर्धा एकदिवसीय आणि टी-20 या स्वरूपात झाली असली तरी, जास्तीत जास्त 6 संघच यात सहभागी झाले होते. पण यावेळी संघांची संख्या वाढल्यामुळे स्पर्धेची रंगत आणखी जबरदस्त होणार आहे. त्यात टी-20 स्वरूप असल्याने सामन्यांमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजीही पहायला मिळेल. 9 सप्टेंबरला स्पर्धेचा पहिला सामना रंगण्यापूर्वी, एशिया कपमध्ये सहभागी होत असलेल्या सर्व संघांची आयसीसी टी-20 संघ रँकिंगवर एक नजर टाकून घ्या.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या क्रमवारीत टीम इंडिया सध्या अव्वल स्थानी आहे. भारताची रेटिंग 271 आहे, जी दुसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियापेक्षा पाच गुणांनी जास्त आहे. मात्र ऑस्ट्रेलिया आशिया कपमध्ये सहभागी होणार नाही. भारतीय संघाने 2024 पासून आतापर्यंत 31 टी-20 सामने खेळले असून त्यात केवळ तीन वेळाच पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारतीय संघ अव्वल स्थानी आहे, तर एशिया कपमध्ये सहभागी होणाऱ्या संघांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका आहे, जी सध्या जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. पाकिस्तान संघ आठव्या स्थानी आहे, ज्याने 2025 मध्ये खेळलेल्या 14 सामन्यांपैकी सात पराभव पत्करले आहेत. अफगाणिस्तान नवव्या तर बांगलादेश दहाव्या स्थानावर आहे. एशिया कपमध्ये खेळणाऱ्या संघांपैकी फक्त हे पाच संघच आयसीसीचे पूर्ण सदस्य आहेत.
त्यांच्यानंतर संयुक्त अरब अमिरात (UAE) चा क्रमांक लागतो, जो टी-20 क्रमवारीत 15व्या स्थानावर आहे. 20वे स्थान ओमानकडे आहे, तर हाँगकाँग सध्या 24व्या पायरीवर आहे. विशेष म्हणजे, आशिया कपचे सामने युएईमध्येच खेळले जाणार आहेत.
Comments are closed.