साडीत जाड दिसायचं टेन्शन विसरा, फक्त वापरा या टिप्स
साडी हे प्रत्येक स्त्रीचं पहिलं प्रेम असतं. सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत. एरव्ही साडी नेसायचा कंटाळा केला तरी सणवारात महिला साडी हमखास नेसतात. साडी नेसल्यावर प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं, त्यावरील साजश्रृंगारामुळे कोणतीही स्त्री छानच दिसते. खरं तर, भारतीय महिलांची ओळख म्हणजेच साडी. काळ कितीही बदलला तरी साडीची फॅशन अद्यापही जूनी झालेली नाही.
बदलत्या काळात साडीही आधुनिक झाली आहे. म्हणूनच आज काल साडी वापरण्याच्या पद्धतीत बदल होताना दिसून येतात. साडी विविध पद्धतीने नेसली जाते. पण, साडी नेसताना अनेक महिलांचे असे होते की, त्या थोड्या जास्त वजनामुळे जाड दिसतात, ज्यामुळे त्यांचा लूक आणि मूड दोन्हीही खराब होतो. तुमच्याही बाबतीत असेच घडते का? मग अजिबात टेन्शन घेऊ नका, आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही साडीत स्लिम नक्कीच दिसू शकाल.
साडीचे फॅब्रिक –
साडी निवडताना तुमची फिगर आधी लक्षात घ्या. कारण अनेकदा असे होते की, आवडली की खरेदी केली. पण, अशी चूक करू नये. साडी खरेदी करताना तुमची फिगर लक्षात घ्या. जर तुमचं वजन जाड असेल तर कॉटन, टिश्यू, सिल्क अशा फॅब्रिकच्या साड्या खरेदी कराव्यात.
शॉर्ट प्रिंट –
जर तुम्ही थोड्या स्थुल अथवा कमी उंचीच्या असाल तर साडीत उंच आणि बारीक दिसण्याची ही एक चांगली युक्ती आहे, ती म्हणजे छोटी प्रिंट. छोट्या प्रिंटमुळे तुम्ही साडीत स्लिम आणि उंच दिसाल.
पातळ बॉर्डरच्या साड्या –
साडीत बारीक दिसण्यासाठी पातळ बॉर्डरच्या साड्या निवडाव्यात. पातळ बॉर्डर कमरेचा भाग काही प्रमाणात सडपातळ दिसतो.
लांब हाताचे ब्लाऊज
साडीपेक्षा तुम्ही ब्लाऊज काय घालता यावर तुमचा संपूर्ण लुक अवलंबून असतो. कितीही भारी साडी असेल तर ब्लाऊज चांगलं नसेल तर त्या साडीमुळे तुमच्या सौंदर्यात भर पडणार नाही. जर तुम्हाला बारीक दिसायचं लांब बाह्यांचे ब्लाऊज घालायला हवे . कारण यामुळे तुमचे दंड झाकले जातील आणि तुमच्या खांदे आणि हाताकडचा भाग एकसमान दिसेल.
भरजरी साडी नको
खूप जणांना डिझायनर साड्या नेसायला फार आवडतात. पण त्या साड्या घेतानाही उंचीचा विचार करणे फारच गरजेचे असते. जर तुम्ही खूप भरजरी साडी घेतली तर नक्की त्यामध्ये तुमची उंची झाकोळली जाते. तुम्हाला एक प्रकारचा ग्रेस मिळत नाही. जर तुम्हाला डिझायनर साड्या निवडायच्या असतील तर तुम्ही तुमच्या साड्यांचा काठ हा थोडा डिझायनर निवडा.
हेही वाचा – पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा…गणपतीला पैठणी ना सही, पैठणी जॅकेटने मिळवा रॉयल लूक
Comments are closed.