जम्मू -काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडतो

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर कोसळल्या दरडी, अनेक भाविक अडकले, प्रदेशात पावसामुळे 38 ठार

मंडळ / श्रीनगर

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात अतिवृष्टीचा धुमाकूळ होतच असून आतापर्यंत महापूर आणि दरडी कोसळल्याने 38 जणांचा बळी गेला आहे. पावसाने गेल्या दोन दशकांमधील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. वैष्णोदेवी यात्रेला सर्वाधिक फटका बसला आहे. अनेकदा ही यात्रा थांबविण्यात आली आहे. यात्रामार्गावर दरडी कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेक भाविक अडकले असून त्यांना सोडविण्याचे प्रयत्न होत आहेत.

गेल्या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टीचा कहर झाला आहे. पुरात वाहून गेल्याने आणि घरे पडल्याने 38 जणांना प्राण गमवावे लागले. या प्रदेशाच्या सहा जिल्ह्यांनी अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसत आहे. आणखी दोन दिवस ही स्थिती राहील असे अनुमान पर्जन्यमान विभागाने व्यक्त केले आहे.

जम्मू विभागात स्थिती दयनीय

जम्मू भागातील रेसाई जिल्ह्यात पावसाने तीन दशकांमधला विक्रम केल्याची माहिती देण्यात आली आहे. या भागात आतापर्यंत तीनदा ढगफुटी झाली असून अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. आपत्कालीन साहाय्यता दले रात्रंदिवस काम करीत असून अनेक पर्यटकांची आणि भाविकांची सुटका करण्यात त्यांना यश आले आहे. त्यांनी त्वरित प्रभावी कामगिरी केल्याने जीवीत हानी मोठ्या प्रमाणात नियंत्रणात राहिली, अशी माहिती अनेक स्थानिकांनीही दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तातडीने बुधवारी जम्मू भागाचा दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी जलवृष्टी प्रभावित क्षेत्रांमध्ये काहीकाळ थांबून आपत्ती निवारणाच्या कामाचीही पाहणी केली आणि काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क केला असून त्यांना परिस्थितीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून आवश्यक ते सर्व साहाय्य केले जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याची माहिती ओमर अब्दुल्ला यांनी नंतर दिली आहे.

रेल्वे वाहतूक विस्कळीत

उत्तर रेल्वे विभागाने जम्मू आणि खेरा भागात धावणाऱ्या 58 गाड्या रद्द केल्या आहेत. तर 68 गाड्यांचे प्रवास कमी करण्यात आले आहेत. काही गाड्यांच्या मार्गांचे परिवर्तन करण्यात आले आहेत. पावसामुळे आणि दरडी कोसळल्याने रेल्वेवाहतुकीवर विपरित परिणाम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदी व्यथित

जम्मू-काश्मीर भाग आणि वैष्णोदेवी यात्रामार्गावर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जीवीत हानीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त पेले आहे. पिडीतांच्या परिवारांना केंद्र सरकार शक्य ते सर्व साहाय्य देईल. या आपत्तीत जे जखमी झाले आहेत, त्यांना लवकरात लवकर बरे वाटो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. पिडीतांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे.

Comments are closed.