तीन महिन्यांच्या शांततेनंतर आरसीबीची भावनिक पोस्ट; ‘RCB CARES’ उपक्रमाची घोषणा
बंगळुरू: तब्बल तीन महिन्यांच्या शांततेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर चाहत्यांसाठी भावनिक संदेश शेअर केला आहे. “Dear 12th Man Army, हे आमचं मनापासूनचं पत्र तुमच्यासाठी,” अशा शब्दांत आरसीबीने चाहत्यांना उद्देशून संवाद साधला.
4 जूननंतर आरसीबीच्या अकाऊंटवर कोणतीही पोस्ट नव्हती. याबाबत संघाने स्पष्ट करताना म्हटलं आहे की, “ही शांतता गैरहजेरी नव्हती, ती दु:ख होती. त्या दिवशी आमची मनं तुटली आणि त्यानंतरची शांतता म्हणजे आठवणी जपण्याचा मार्ग होता.”
संघाने पुढे लिहिलं आहे की, या काळात आम्ही शोक केला, ऐकलं, शिकलो आणि हळूहळू केवळ प्रतिसाद न देता त्यापेक्षा अधिक काहीतरी उभारण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच ‘RCB CARES’ हा नवा उपक्रम जन्माला आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा उद्देश चाहत्यांच्या सोबत उभं राहणं, त्यांना सन्मान देणं आणि एकत्रितपणे पुढे जाणं हा असल्याचे आरसीबीने स्पष्ट केलं. “आज आम्ही या जागेत परत आलो आहोत उत्सव साजरा करायला नाही, तर काळजी घेण्यासाठी. कर्नाटकाचा अभिमान राहण्यासाठी,” असेही संघाने म्हटले आहे.
आरसीबी व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, “चाहते हे आमचं सर्वात मोठं बळ आहेत. त्यांच्या सोबतच समाजाच्या विविध गरजांकडे लक्ष देणं ही आमची जबाबदारी आहे. केवळ मैदानावर नव्हे तर मैदानाबाहेरही बदल घडवणं हा या उपक्रमाचा खरा हेतू आहे.”
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.