हिरवागार दुर्वांचे भन्नाट फायदे, त्वचेपासून ते विविध आजारांवर ठरतात गुणकारी
संपुर्ण भारतात गणपती बाप्पाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बाप्पाची मनोभावे पूजा केली जात असून बाप्पाचा आवडता मोदक आणि लाडवांसोबत त्याला दूर्वादेखील वाहिला जातो. गणपतीच्या पूजेत हार, फळ, फुलांइतकेच हिरव्यागार दुर्वांना फार महत्त्व दिले जाते. पण, तुम्हाला हे माहिती आहे का, बाप्पाच्या आवडत्या दुर्वा आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. यात अनेक पोषकतत्वे असतात, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. आरोग्याच्या विविध तक्रारी दूर करण्यासाठी दुर्वा उपयुक्त असतात. चला तर मग जाणून घेऊयात हिरवागार दुर्वांचे भन्नाट फायदे
- दुर्वा आरोग्यासाठी लाभदायक असतात. यात प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, फायबर आणि पोटॅशियम असतात.
- पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी दुर्वांचा रस फायदेशीर असतो.
- दुर्वाच्या रसामुळे छातीत जळजळ, आम्लता आणि बद्धकोष्ठता दूर होते.
- दुर्वामध्ये ऍटी-ऑक्सिडंट्स, दाहक विरोधी गुणधर्म असतात.
- दुर्वाची पेस्ट त्वचेवर लावल्यास खाज सुटणे, पुरळ येणे अशा त्वचेसंबंधित समस्या कमी होतात.
- तोंड आलं असेल तर दुर्वांचा रसाने गुळण्या कराव्यात.
- दुर्वा महिलांसाठी फायदेशीर आहेत. दुर्वा दह्यासोबत घेतल्यास महिलांमध्ये अंगावरून जाण्याची समस्या कमी होते.
- नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करण्यासाठी दुर्वा फायदेशीर आहेत.
- दुर्वाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात ज्या लोकांना उष्णतेचा त्रास होतो, त्यांच्यासाठी दुर्वा फायदेशीर आहेत.
हेही पाहा –
Comments are closed.