निलंगा तालुक्यातील कलांडीत पहाटे दोन घरे पडली; सुदैवाने जीवितहानी टळली

निलंगा तालुक्यातील मौजे कलांडी गावात रात्रभर झालेल्या पावसामुळे पहाटे दोन घरे पडली. याच भिंतीखाली दोन मोटारसायकली अडकल्या असून सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. निलंगा तालुक्यात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे मौजे कलांडी येथील उत्तम बाजीराव सुर्यवंशी, भगवान रावसाहेब सुर्यवंशी यांच्या घराची भिंत बाहेरच्या बाजूला पडून मोठे नुकसान झाले.

याच भिंतीला लागून रस्त्यावर उभा केलेल्या व्यंकट पंढरीनाथ सुर्यवंशी, सचिन नागनाथ सूर्यवंशी यांच्या दोन मोटारसायकली ढिगाऱ्याखाली अडकून नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने पडलेल्या घरांचा तात्काळ पंचनामा करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Comments are closed.