शासनाची ती अट मला मान्य…, मनोज जरांगेंचं मोठं विधान, शिवनेरीच्या पायथ्यावरुन काय म्हणाले?
मनोज जारानरेंज पावेल: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आता शिवनेरीवरुन मुंबईकडे रवाना झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी काल अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे आज सकाळी शिवनेरीवर पोहचले होते. यावेळी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन मनोज जरांगे पुन्हा मुंबईकडे निघाले आहेत. यावेळी जुन्नरमध्ये पोहचताच मनोज जरांगेंनी भाषण केलं. समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसायच नाही. आंदोलनासाठी सरकारने आपल्याला परवानी दिली आहे. त्याबद्दल सरकारचं कौतुक, असं मनोज जरांगेंनी सांगितले.
शिवनेरीच्या पायथ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विनंती आहे, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनासाठी परवानगी मिळावी. आम्ही नियमात राहून आंदोलन करु, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्ही अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करु, कायद्याचे पालनही करु, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच उपस्थितांना संबोधित करताना आपल्याला कायद्याचे पालन करायचं आहे. हाता-तोंडाला आलेला घास घालवू नका, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं.
इतर लोक दुसऱ्या मैदानात बसू, पण मी मागे हटत नाही- मनोज जरांगे
आझाद मैदानावर फक्त पाच हजार आंदोलकांनाच येता येईल, अशी अट पोलिसांकडून मनोज जरांगेंना घालण्यात आली आहे. यावर देखील मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शासनाची पाच हजाराची अटही आम्हाला मान्य आहे. ते लोक पाच हजार म्हणतात, आम्ही चार हजार लोक आंदोलनाला बसू…इतर लोक दुसऱ्या मैदानात बसू, पण मी मागे हटत नाही, असा मनोज जरांगेंनी सांगितले.
मनोज जराजेना मुंबई पोलिसांनी अटी शर्तींसह परवानगी-
मराठा आंदोलक मनोज जरेंग यांच्या मुंबईतल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी अटीशर्तींसह परवानगी दिली आहे? वास्तविक मुंबईत पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मनोज जरेंगना मनाई केली होती? पण मराठा आरक्षणासाठी मुंबईत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार करून मनोज जरेंग आज अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत? त्यांना मुंबईच्या वाटेवर असताना राज्य सरकारकडून परवानगीचं सरप्राईज गिफ्ट मिळालं? अर्थात ही परवानगी फक्त 29 ऑगस्टला एका दिवसाच्या आंदोलनाची आहे? त्यासाठी आझाद मैदानात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेची मुभा देण्यात आली आहे?
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.