यकृताच्या संसर्गाची लक्षणे आणि उपाय, वाचा संपूर्ण माहिती
आपले यकृत हे शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. यकृत अन्नाचे उर्जेमध्ये रुपांतर करण्यापासून ते शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यापर्यंत अनेक महत्त्वाची कामे करते. यकृत पोटाच्या उजव्या बाजूला, बरगड्यांच्या खाली असतो. पण, जेव्हा यकृत संसर्गाचा बळी पडतो. तेव्हा संपूर्ण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यकृत संसर्गाची लक्षणे वेळीच ओळखली तर भविष्यात होणाऱ्या समस्या टाळल्या जाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात, यकृताचा संसर्गाची लक्षणे आणि उपाय याविषयी सविस्तरपणे,
लक्षणे
- कावीळ
- सतत थकवा
- भूक न लागणे
- ओटीपोटात दुखणे
- मळमळ आणि उलट्या
- लघवीचा रंग बदलणे
कारणे –
- दूषित पाणी
- दूषित धान्य
- औषधांचा अतिरेक
- असुरक्षित संभोग
- कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती
संसर्ग किती धोकादायक?
- यकृताच्या संसर्गामुळे त्याचे कार्य हळूहळू कमी होत जाते.
- शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात.
- पचनसंस्थेवर परिणाम होऊन ती कमकुवत होते.
- यकृत सिरोसिस आणि कॅन्सरचा धोका वाढतो.
सोपे उपाय –
- स्वच्छ पाणी आणि स्वच्छ अन्नाचे सेवन करा.
- दूषित पाणी आणि अन्न पिणे टाळा.
- दारू आणि धुम्रपानापासून दूर राहा.
- हिपॅटायटीस ए आणि बी टाळण्यासाठी लसीकरण करावे.
- वैयक्तिक स्वच्छता पाळावी.
हेही पाहा –
Comments are closed.