Health Tips: तुम्हीही टाईट जीन्स घालता? मग सावधान आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

टाईट जीन्स घालणे हे आजकाल फॅशन ट्रेंडचा भाग झाला आहे. मात्र हा फॅशन ट्रेंड तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. होय, टाईट जीन्स घातल्याने महिलांच्या आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात. टाईट जीन्स घातल्याने पोटदुखी, योनीमार्गात संसर्ग आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याबाबत तज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया…

तज्ञांच्या मते, टाईट जीन्स घातल्याने रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतो. यामुळे ओटीपोटात ताण किंवा वेदना होऊ शकते.

शिवाय जर तुम्हाला आधीच यीस्ट इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल योनिओसिससारख्या संसर्गाचा त्रास होत असेल तर घट्ट जीन्समुळे हा त्रास आणखीनच वाढू शकतो. खरे तर, फार टाईट कपडे घातल्याने ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू शकते. यामुळे खाज येऊ शकते आणि दुर्गंधी वाढते.

अशा प्रकारच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी नेहमी ऑरगॅनिक कॉटनचे इनरवेअर वापरणे चांगले असते.

शिवाय जर तुम्हाला जीन्स घालायची असेल तर स्ट्रेचेबल आणि आरामदायी फिट जीन्स निवडा.

गरोदरपणात घट्ट जीन्स टाळा:

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरोदरपणात महिलांच्या पोटाच्या खालच्या भागात अनेक बदल होतात. गरोदरपणात घट्ट जीन्स घालण्यामुळे पोट फुगल्यासारखे होते. गर्भधारणा जसजशी पुढे जाते तसतसे पोटाचा आकार वाढतो. अशा परिस्थितीत घट्ट जीन्समुळे पोटावर दाब येतो ज्यामुळे अस्वस्थ वाटते.

गर्भवती महिलांसाठी पर्याय:

जर तुम्हाला गरोदरपणातही जीन्स घालायला आवडत असेल, तर आजकाल मॅटर्निटी जीन्स सहज उपलब्ध आहेत. या जीन्सना इलास्टिक असते. या जीन्स खूप आरामदायी असतात.

Comments are closed.