गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा! माजी खेळाडूने केले वादग्रस्त विधान

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार खेळाडू श्रेयस अय्यर यांच्यातील नातेसंबंधांबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरूच असते. आशिया कप 2025 साठी अय्यरला संघात स्थान न मिळाल्यानंतर ही चर्चा आणखी चांगलीच रंगली. त्यामुळे आता माजी भारतीय खेळाडू देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी या दोघांच्या नातेसंबंधांबद्दल मोठा खुलासा केला आहे. याशिवाय त्यांनी शुबमन गिलविषयीही मत व्यक्त केले आहे.

हेड कोच गौतम गंभीर यांच्यासोबत खेळलेले मनोज तिवारी यांनी श्रेयस अय्यरसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल बोलताना क्रिक्ट्रॅकरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले,
“माझ्या मते श्रेयस अय्यर नक्कीच टीम इंडियाचे कर्णधार होतील आणि तेही बराच काळ, पण त्याच वेळी त्यांची गिलसोबत कर्णधारपदासाठी स्पर्धा असेल. कारण सध्याचे हेड कोच गौतम गंभीर यांना शुबमन गिल श्रेयस अय्यरपेक्षा जास्त आवडतो. त्यामुळे ही स्पर्धा नक्कीच होईल. पुढे काय घडते हे पाहणे खूप महत्त्वाचे असेल.”

Comments are closed.