Asia Cup: टीम इंडियाच्या चाहत्यांना दिलासा, शुबमन गिल वेळेत बरा होऊन आशिया कपसाठी फिट राहणार
9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपच्या (Asia Cup 2025) अगोदर, बंगळुरूमध्ये दुलीप ट्रॉफीचे (Dulip Trophy) दोन्ही क्वार्टर फायनल सामने खेळले जात आहेत. चार दिवसांची ही रेड बॉल झोनल स्पर्धा असली तरी आशिया कपसाठी निवडलेले बहुतांश दिग्गज यात खेळत नाहीत. मोठी बातमी अशी आहे की, टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिलला (Shubman gill) अचानक व्हायरल फिव्हर झाल्याने त्याला दुलीप ट्रॉफीतून बाहेर पडावं लागलं.
रिपोर्टनुसार गिल आशिया कपच्या पाच दिवस आधी टीम प्रॅक्टिसमध्ये सामील होईल. सध्या तो रिकव्हरीच्या टप्प्यात आहे. गिल व्यतिरिक्त अभिमन्यु ईश्वरन (Abhimanyu Easwaran) आणि ध्रुव जुरेलही (Dhruv jurel) क्वार्टर फायनल सामन्यातून बाहेर झाले आहेत. गिल फिट असता तर नॉर्थ झोनचं नेतृत्व त्याला करावं लागलं असतं.
या दुलीप ट्रॉफीत आशिया कप संघातील फक्त तीनच खेळाडू दिसत आहेत. नॉर्थ झोनमध्ये अर्शदीप सिंह व हर्षित राणा, आणि सेंट्रल झोनमध्ये कुलदीप यादव. दुसरीकडे रिंकू सिंह यूपी टी20 लीगमध्ये चमक दाखवत आहे, तर संजू सॅमसन केरल क्रिकेट लीगमध्ये दमदार खेळ करून टीममध्ये जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
टीमचा सराव आणि आशिया कपसाठी तयारी
मिळालेल्या रिपोर्टनुसार, टीम इंडिया सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आशिया कपसाठी रवाना होईल. त्यांना 5–6 दिवस सरावाची संधी मिळेल. मात्र टीम इंडिया कोणताही सराव सामना खेळणार नाही. दुसरीकडे पाकिस्तान (ग्रुप A), अफगाणिस्तान (ग्रुप B) आणि यजमान यूएई (ग्रुप A) त्रिकोणी मालिकेत खेळणार आहेत. तसेच बांगलादेश संघ नेदरलँड्सविरुद्ध प्रॅक्टिस सामना खेळताना दिसेल.
भारताला ग्रुप A मध्ये पाकिस्तान, ओमान आणि यजमान यूएई सोबत ठेवण्यात आलं आहे. 14 सप्टेंबरला भारत–पाकिस्तानचा (IND vs PAK) सामना रंगणार असून त्यापूर्वीपासूनच क्रिकेटप्रेमींचा उत्साह तुफान वाढला आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय खेळाडूंनी दिलेल्या शानदार कामगिरीनंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
भारत–पाक युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरनंतर, भारत पाकिस्तान सामन्याचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. जर दोन्ही संघ फायनलपर्यंत पोहोचले तर या एका स्पर्धेत त्यांची तिनदा भिडंत होऊ शकते. दबावाखाली कोण कुणावर जड ठरतं, याचा निकालही स्पष्ट होईल. तरीही टीम इंडियाचं पारडं अधिक जड मानलं जात आहे.
Comments are closed.