हिंदुस्थानवर अण्वस्त्र डागा…; अमेरिकेत शाळेमध्ये गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने बंदुकीवर लिहिले

अमेरिकेत धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंदुस्थानवर अण्वस्त्र हल्ल्याची मागणी करत एका माथेफिरुने शाळेत गोळीबार केला. या गोळीबार दोन निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाला आहे. अमेरिकेतील मिनियापोलिसमधील एका चर्चमधील शाळेत ही घटना घडली.

शाळेत गोळीबार केल्यानंतर आरोपीने पलायन केले. रॉबिन वेस्टमन असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अमेरिकेतील मिनियापोलिसमधील एका चर्चमधील शाळेत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय आरोपीकडे रायफल, शॉटगन आणि पिस्तूल होती. आरोपी चर्चजवळील शाळेजवळ आला आणि खिडकीच्या आत रायफलमधून गोळीबार केला.

हल्ला करण्यापूर्वी रॉबिनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शस्त्रांवर त्याने मजकूर लिहिण्यात आला आहे. ‘न्यूक इंडिया’ म्हणजे हिंदुस्थानवर अण्वस्त्र हल्ला करा, असे शस्त्रांवर लिहिलेल्या मजकूरात म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे.

Comments are closed.