क्रिकेटचा थरार! भारत-पाक सामन्याचं तिकीट 15 लाखांवर पोहोचलं
आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान यांचा हायव्होल्टेज सामना 14 सप्टेंबर रोजी दुबईत खेळवला जाणार आहे. काही चाहत्यांनी या सामन्याचा बहिष्कार करण्याची मागणी केली असली, तरीही तिकिटांची मागणी प्रचंड वाढली आहे. अधिकृत तिकिट विक्री अद्याप सुरूही झालेली नाही, पण तरीसुद्धा ब्लॅक मार्केटमध्ये एका तिकिटाची किंमत तब्बल 15.75 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आयोजकांनी इशारा दिला आहे की चाहते फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच तिकिटे खरेदी करावीत आणि फसवणुकीपासून सावध राहावे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर झालेल्या “ऑपरेशन सिंदूर” नंतर प्रथमच सामना खेळला जाणार आहे. दोन्ही देशांतील तणावामुळे काही चाहत्यांनी या सामन्याचा बहिष्कार करण्याची मागणी केली आहे. मात्र तरीसुद्धा या सामन्याच्या तिकिटांच्या किमती गगनाला भिडत आहेत. अहवालानुसार ब्लॅक मार्केटमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट 15 लाख रुपयांहून अधिक किमतीत विकले जात आहे.
मात्र आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आशियाई क्रिकेट परिषद (ACC) ने अद्याप अधिकृतरीत्या तिकिटांची विक्री सुरू केलेली नाही. तरीदेखील अनेक थर्ड पार्टी वेबसाईट्सवर तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. या पैकी काही साइट्सवर तिकिटांची किंमत 26,256 रुपये (AED 1100) पासून तब्बल 15.75 लाख रुपये (AED 66,000) इतकी लिस्ट करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी चाहत्यांना इशारा दिला आहे की त्यांनी या बनावट साइट्सवरून तिकिटे खरेदी करू नयेत.
आशियाई क्रिकेट कौन्सिलने चाहत्यांना इशारा दिला आहे की त्यांनी या बनावट वेबसाईट्सवरून तिकिटे खरेदी करू नयेत. ईसीबीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुभान अहमद म्हणाले, “आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि ईसीबीला सोशल मीडियावर अलर्ट जारी करावा लागला, ज्यामध्ये चाहत्यांना सल्ला देण्यात आला की विक्री सुरू झाल्यावर तिकिटे फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच खरेदी करावीत.”
Comments are closed.