मुंबई रांगायला लागली; रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी, मध्य रेल्वे पुन्हा कोलमडली

मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना रस्त्यावरील खड्डे आणि प्रचंड वाहतूककोंडीमुळे संपूर्ण मुंबई अक्षरशः ‘रांगा’यला लागली आहे. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गासह सर्वच अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. यातच दीड दिवसाच्या बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. यातच टिटवाळा-आंबिवलीदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने दुपारपासून मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली. गाड्या तब्बल एक तास उशिराने धावत होत्या.
सर्वांचा लाडका बाप्पा विराजमान झाल्यामुळे मुंबईतील सर्वच मार्केट फुले, सजावट साहित्य आणि प्रसादाच्या साहित्याने फुलून गेल्या आहेत. खरेदीसाठी भाविकांची मार्केटमध्ये गर्दी होत असल्याने वाहनचालकांनाही वाट काढताना कसरत करावी लागत आहे. पश्चिम उपनगरात जाताना आणि मुंबईत येतानाही अर्धा ते पाऊण तासाच्या प्रवासासाठी तब्बल एक ते दोन तासांचा वेळ लागत आहे. इस्टर्न एक्स्प्रेस वेवरदेखील हीच स्थिती होती. मध्य रेल्वे कोलमडल्याने गणपती दर्शनासाठी निघालेल्या मुंबईकरांची रेल्वेतच रखडपट्टी झाली.
या ठिकाणी कोंडी
- जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड
- मालाड पठाणवाडी
- कांदिवली ग्रोव्हेल्स मॉल
- दाहिसर चेक नाका
- एसव्ही आणि लिंक रोड
- दादर, लालबाग
- बाहेर निरीक्षक, क्र. एम.जो पथ
मुंबई-गोवा महामार्गावरही कोंडी
मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांना बंदी घातली असताना अनेक वाहने या मार्गावर धावत होती. त्यामुळे संपूर्ण मार्गावर अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मंडपातील श्रेणी
मुंबईमध्ये अडीच लाखांवर घरगुती बाप्पांचे पूजन केले जाते. यामध्ये लाखो गणपतींचे दीड दिवस सेवा करून विसर्जन केले जाते. आता दीड दिवसांच्या घरगुती बाप्पांचे विसर्जन झाल्याने सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये लांबच लांब रांगा लावत आहेत.
Comments are closed.