Maharashtra Breaking LIVE : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…
मनोज जरेंगे मराठा आरक्षण रॅली: आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना एका वेळी एकाच दिवसाची परवानगी मिळालीय. शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आज एकच दिवस जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करावं लागणार आहे. एका दिवसात आंदोलन कसं करणार, असा सवाल जरांगेंनी सरकारला केलाय. आणखी काही दिवसांची परवानगी मागणार असल्याचं सांगितलं जातंय. पण तशी परवानगी मिळाली तरी परवा शनिवार असल्यानं नियमानुसार जरांगेंना आजनंतर सलग आंदोलन करता येणार नाही. त्यामुळे शनिवारी, रविवारी जरांगेंचा मुक्काम कुठे असणार हा प्रश्न आहे.
Comments are closed.