पाटीदार, मालेवार यांची दणकेबाज शतके, मध्य विभागाच्या पहिल्या दिवशी 2 बाद 432 धावा

हिंदुस्थानच्या स्थानिक क्रिकेट हंगामाची सुरुवात गुरुवारी दुलीप करंडक स्पर्धेने झाली. यात मध्य विभाग संघाने पहिल्या दिवशी 2 बाद 432 धावसंख्या उभारून दमदार सुरुवात केली. दानिश मालेवार (नाबाद 198) व कर्णधार रजत पाटीदार (125) यांची दणकेबाज शतके ही मध्य विभागाच्या पहिल्या दिवसाची वैशिष्टये ठरली.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यश राठोड 32 धावांवर द्विशतकाच्या समिप असलेल्या मालेवारला साथ देत होता. उत्तर-पूर्व विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आकाश चौधरीने मध्य विभागाच्या आयुष पांडेला केवळ 3 धावांवर चेत्रीकरवी झेलबाद करीत उत्तर-पूर्व विभागाला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्यानंतर दानिश मालेवारने यष्टिरक्षक आर्यन जुयालसोबत भागीदारी करत संघाचा डाव सावरला. आर्यन 60 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. मग चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार रजत पाटीदारने आक्रमक फलंदाजी करत केवळ 96 चेंडूंत 21 चौकार व 3 षटकारांसह 125 धावा ठोकल्या.
Comments are closed.